खारेपाटण प्रशाळेस दहा हजारांची देणगी
०६८४२
खारेपाटण प्रशाळेस
दहा हजारांची देणगी
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २६ : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त दिगंबर राऊत यांनी प्रशालेसाठी दहा हजार रुपयांची रक्कम देणगी स्वरुपात दिली. त्यांच्या या दातृत्वाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. श्री. राऊत यांनी ही रक्कम प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांच्याकडे नुकतीच सुपूर्द केली. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, संस्थेचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. संस्थाध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी राऊत यांचे शाळा व संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले.
०६८४३
प्रकाश आजविलकर यांना
कोकण कलाभूषण पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २६ : बुद्ध, फुले, शाहू व आंबेडकर चळवळीतील कवी, गायक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आजविलकर (मु. रा. अजिवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांना सम्यक कोकण कला संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘राजकीय सम्यक कोकण कलाभूषण पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. सम्यक कोकण कला संस्थेच्या २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त समाजातील विविध स्तरांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. आजविलकर हे महाराष्ट्रात समाजामध्ये प्रबोधनाचे काम करत आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाचे ते पदाधिकारी आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांना राजकीय सम्यक कलाभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण मुंबई दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे शनिवारी (ता. २९) मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

