काँग्रेसकडे सत्ता द्या; सुविधा देऊ
(दोन्ही बातम्या सेम सेम वापरा)
06852
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना अॅड. दिलीप नार्वेकर. बाजूला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. साक्षी वंजारी, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर. (छायाचित्र ः रुपेश हिराप)
काँग्रेसकडे सत्ता द्या; सुविधा देऊ
अॅड. दिलीप नार्वेकर ः कर सवलतीचाही विचार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः जनतेने काँग्रेसच्या हाती सत्ता दिल्यास सर्वप्रथम पाणीपट्टी, घरपट्टी ५० टक्के माफ करण्याचा विचार आहे. सत्ता आल्यास निश्चितच शहरवासीयांना चांगल्या पद्धतीने सुविधा देऊ, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांनी आज येथे व्यक्त केले.
ॲड. नार्वेकर यांनी नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारासह आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, राजन म्हापसेकर, संजय लाड यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साक्षी वंजारी नगरसेवक पदाचे उमेदवार सुनिल पेडणेकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, समीर वंजारी, अरूण भिसे उपस्थित होते.
ॅॲड. नार्वेकर म्हणाले, ‘‘मी सावंतवाडीत तीन टर्म नगराध्यक्ष म्हणून काम केले. आताच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व्हावी, अशी अपेक्षा होती. त्यासाठी प्रयत्नही केले. मात्र, ती झाली नाही. आता आमची ताकद काय आहे? हे दाखवून देण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह १७ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. या ठिकाणी आज सर्वच पक्ष विकासाच्या गप्पा मारत आहेत. मात्र, विकासाचा प्लॅन कोणाकडेच नाही. तो प्लॅन असल्याशिवाय शहराचा विकास साध्य नाही. शहरात पार्किंगसह इतरही गैरसोय आहेत. आमची सत्ता आल्यास शहराचे योग्य नियोजन करण्यासह विविध गोष्टी नव्याने अंमलात आणू. सर्वप्रथम नागरिकांची पाणीपट्टी, घरपट्टी ५० टक्के माफ करण्याचा आमचा विचार आहे. सत्ता आल्यास निश्चितच शहरवासीयांना चांगल्या पद्धतीने सुविधा देऊ.’
ते म्हणाले, ‘सावंतवाडी नगरपालिकेचा श्वास म्हणजे मोती तलाव. मात्र, याच तलावावर मालकीवरुन न्यायालयीन दावा सुरू आहे. न्यायालयीन झाल्यामुळे तलावाचा विकास अशक्य आहे. तसेच अन्य ठिकाणीही न्यायालयीन प्रकरणे असल्याने विकासात्मक गोष्टींमध्ये अडथळा निर्माण होतो. मल्टिस्पेशालिटीचे भूमिपूजन झाले असून जागेचा प्रश्नात ते अडकले आहे. त्यामुळे आयुर्वेद कॉलेजची जागा आम्ही सुचवली. मात्र, त्याकडे लक्ष दिले नाही. आज विरोधकांना सत्तेसाठी मते विकत घेण्याची वेळ आली आहे. जनता आज विकली जात आहे. एका मतासाठी १० हजार देण्याची तयारी आहे. हा माणसाचा रेट लावला जात आहे. हे विष आहे ते तुम्ही स्वीकारू नका.’
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. वंजारी म्हणाल्या, ‘माझ्यासह नगरसेवक पदासाठींचे सर्व उमेदवारांना मतदार साथ देतील. जनतेमधून आम्हाला भरभरून प्रतिसादही मिळत आहे. आम्ही घेतलेल्या स्वबळाच्या निर्णयाचे लोकांनी स्वागत केले. ‘डोअर टू डोअर’ आम्ही प्रचार केला असून निश्चितच काँग्रेसला यश मिळेल.’
-----------------
06849
सावंतवाडी शहर भयमुक्त करू
बबन साळगावकर ः निवडणुकीत भाजपकडून विकासात्मक मुद्दे
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः येथील पालिका आम्ही भाजपतर्फे विकासात्मक मुद्दे घेऊन लढत आहोत. सेंट्रलाईज अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम प्रोजेक्ट करणार आहोत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यासाठी आग्रही आहे. तसेच मंजूरी होऊनही रखडलेले शिरशिंगे धरण पूर्णत्वास आणण्यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांच्याशी चर्चा झाली आहे. येणारा पाच वर्षांचा कालावधी जनतेसाठी समर्पित असून भयमुक्त शहर निर्माण करण्यासाठी पुढाकार राहील. दिलेलं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील, असे मत माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे नगरसेवक पदासाठीचे उमेदवार बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या माध्यमातून ६४ कोटींची नळपाणी योजना मंजुर झाली आहे. ते काम सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आम्ही केला. मात्र, नंतर तिथे लक्ष दिलं गेलं नाही. मात्र, आम्ही आदर्शवत असा प्रकल्प उभारू. तर जानेवारीत सावंतवाडी पर्यटन महोत्सव घेणार आहोत. रिंगरोडचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत. विकासात्मक मुद्यावर निवडणूक लढत असून वचननामा घेऊन आम्ही जात आहोत. ही आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी माझी अन् नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांची राहणार आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘मी कोणावरही टीका करणार नाही. भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते बुजवण्यासाठी पैसे न दिल्याने तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. युवराज्ञी उत्कृष्ट आणि काम करणाऱ्या आहेत. घराघरात त्यांच स्वागत होत आहे. त्यांचा विजय निश्चितच होईल.’ मल्टिस्पेशालिटीसाठी प्रकल्प कोणी आणला? त्यांच्याकडूनच उत्तर घ्यावीत, असे विधान त्यांनी यासंदर्भातील प्रश्नावर केले. यावेळी उमेदवार सुनिता पेडणेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते दादू कविटकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

