सुरक्षित रस्ते आणि स्वच्छ शहर सुरक्षित रस्ते आणि स्वच्छ शहर
आवाज मतदारांचा - लोगो
इंट्रो
रत्नागिरी हे कोकणातील एक महत्वाचे औद्योगिक विकसनशील शहर आहे. रत्नागिरी शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. कोकणातील प्रमुख बंदर आहे. मत्स्य, आंबा, काजू आणि पर्यटन उद्योगाचे मुख्य केंद्र आहे. या शहराच्या औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती आणि विकासावर संपूर्ण जिल्ह्याचा विकास अवलंबून राहतो. त्यावरच येथील दरडोई उत्पन्नाचा स्तर ठरतो. गेल्या ७ ते ८ वर्षात रत्नागिरी शहर हे शैक्षणिक हब होण्याच्या प्रक्रियेचा मोठा भाग बनले आहे. उच्च शिक्षण, रोजगार, उद्योगाच्या संधी शोधण्यासाठी सभोवतालच्या खेड्यापाड्यातील वाड्यावस्तीतील तरुण येथे येतात....!
- अभिजित हेगशेट्ये, रत्नागिरी
abhijit.shriram@gmail.com
सुरक्षित रस्ते आणि स्वच्छ शहर
तरुणाईची अपेक्षा; नेहमीच्या समस्यांकडे लक्ष देणार का?
रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीचे पडघम आतातर स्वराची पट्टी गाठू लागले आहेत. कोण कोणत्या पक्षात आहे, याचा अंदाज घेणे थोडे डोक्याला शॉट लावते; परंतु प्रत्यकेजण ओळखीचा चेहरा घेऊन जुन्या आठवणींना उजाळा देत घरोघरी येत आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवशी कोण कोणत्या पक्षात का प्रवेशकर्ते झाले, हेच समजले नाही. आजकाल ते फारसे महत्वाचे नाही. राजकीय पक्ष नावाचा विचार, तत्त्व, भूमिका सारेच निकष एआय तंत्रज्ञानाने नवनवा आकार घेत समोर येतात. त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्क्रोल करत पुढे जात राहणे मस्त. त्यामुळे आपल्या वॉर्डातील नगरसेवक पदाचा उमेदवार नक्की कोणत्या पक्षाचा मफलर घेऊन आला, हेच समजत नाही. त्यातील नवमतदार आणि महाविद्यालयीन मतदाराला या निवडणुकीबद्दल काय वाटते, हा प्रश्न फारच महत्वाचा आहे. त्याचा मागोवा घेतल्यानंतर सर्वकाही पुढे आले आहे.
नगरपालिका निवडणूक नगराध्यक्ष आणि आपल्या प्रभागातील नगरसेवकांकडून त्यांच्या अपेक्षा काय, हे लक्षात आले. कॉलेजला स्कूटरवरून येताना अपघात झाला.
अजूनही पाय व्यवस्थित नाहीत. रस्ते नीट, चांगले पाहिजेत. अगदी गुळगुळीत नसले तरी चालतील; परंतु किमान खड्डे तरी नसावेत. इतके खड्डे आणि धूळ आहे की, चालणे मुश्कील होते. दुचाकीवरून येताना अपघात होतात. शेजारून मोठ्या आरामदायी कार जाताना दगड वेगाने उडतात. (पावसात चिखल उडत होता.) आणि जखम करतात. धुळीने तर सतत सर्दी-खोकला त्रास होतो. तेव्हा एकच विनंती, रस्ते चांगले द्या. मोकाट गुरे आणि कुत्रे हा शहरातील फारच महत्वाचा प्रश्न वाटतो. अनेक वर्षे ही गुरे पूर्ण रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर असतात की, कोठून चालावे आणि दुचाकी न्यावी हा प्रश्न आहे. रात्रीच्यावेळी ती दिसतही नाहीत. त्यातून माझ्या मैत्रिणीचा अपघात झाला. आजही तिचा हात प्लास्टरमध्ये आहे. कुत्रेही इतके वाढले आहेत, वेगाने वाढतच आहेत. काही वेळा ५ ते ६ कुत्रे अंगावर येतात. त्यांचे चावण्याचे प्रमाणही वाढत आहे. याच काय करता येईल का? याकडे कुणीतरी लक्ष दिले पाहिजे, हे प्रश्न सुटले पाहिजेत.
दरवर्षी श्रमदानाने एक-दोन दिवस शहराचे समुद्रकिनारे स्वच्छ केले जातात; परंतु ते पुन्हा अस्वच्छ होतात. भाट्येसारख्या समुद्रकिनारी आज हजारो पर्यटक येतात. तरुणांना रोजगाराची संधी देणारा तो आशेचा किरण आहे; मात्र येथील गलीच्छता, तेथे टॉयलेटची नसणारी सुविधा यामुळे रत्नागिरीचा पर्यटन उद्योग अडचणीत येईल. त्याकडे कुणीतरी लक्ष देणारा पाहिजे, अशा माफक; पण तेवढ्याच दखल घ्याव्यात, अशा मागण्या आजच्या तरुणाईकडून केल्या जातात. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते...!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

