

खेर्डी उपसरपंचपदी
वैशाली मोरे बिनविरोध
खतातेंचा राजीनामा ः सुखाई पॅनेलची एकहाती सत्ता
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ : शहराजवळील खेर्डीच्या उपसरपंचपदी वैशाली केतन मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अभिजित खताते यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक झाली. सुखाई परिवर्तन पॅनेलतर्फे खताते यांचा सत्कार करण्यात आला.
खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुखाई परिवर्तन पॅनलने एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर सरपंचपदासह उपसरपंचपदी पॅनेलमधील विविध सदस्यांना सधी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी उपसरपंच अभिजित खताते यांनी पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक घेण्यात आली. सरपंच सुगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. उपसरपंचपदी वैशाली केतन मोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मोरे यांची निवड होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस व पॅनेलप्रमुख जयंद्रथ खताते यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी सभापती स्नेहा मेस्त्री, सरपंच सुगंधा माळी, माजी सरपंच प्रकाश पाथरूड, वृंदा दाते, अपर्णा दाते, अश्विनी पंडित, विनोद भुरण, विजय शिर्के, अभिजित खाताते, सुप्रिया उतेकर, सचिन मोहिते, लालासाहेब मोरे, केतन मोरे, शेबेकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.