सावंतवाडीत सात अपक्ष 
उमेदवारांना चिन्हे वाटप

सावंतवाडीत सात अपक्ष उमेदवारांना चिन्हे वाटप

Published on

सावंतवाडीत सात अपक्ष
उमेदवारांना चिन्हे वाटप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी ७ अपक्षांनी नामनिर्देशन पत्र कायम ठेवले आहे. आज त्यांना चिन्हांचे वाटप करण्यात आले‌. नगराध्यक्षपदासाठी २, नगरसेवकपदासाठी ५ असे ७ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असून शहरात अपक्षांचाही मोठा जोर आहे. यात नगराध्यक्षपदासाठी अन्नपूर्णा कोरगावकर यांना ‘मेणबत्ती’, निशाद बुराण यांना ‘बॅट’ चिन्ह मिळाले आहे. नगरसेवकपदासाठी फरिदा बागवान-फुटबॉल, समीऊल्ला ख्वाजा-कोट, बबलू मिशाळ-नारळ, सुरेश भोगटे नारळ, लतिका सिंग-कपबशी असे चिन्ह वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी मतदान यंत्रातील क्रमवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेच्या उमेदवार अॅड. नीता कविटकर यांच्यासह अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर आणि निशाद बुराण, ठाकरे गटाच्या उमेदवार सीमा मठकर, काँग्रेसच्या साक्षी वंजारी व भाजप उमेदवार श्रद्धा भोसले अशी अनुक्रमे नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com