देव, घैसास, कीर महाविद्यालयात संविधान दिन

देव, घैसास, कीर महाविद्यालयात संविधान दिन

Published on

संविधानामुळेच लोकशाही टिकून
निखिल आपटे : देव, घैसास, कीर महाविद्यालयात संविधान दिन
रत्नागिरी, ता. २६ : भारतीय संविधान म्हणजे लोकशाहीची मजबुती, नागरिकांची जबाबदारी आहे. संविधानामुळेच भारतात लोकशाही टिकून राहिली आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते निखिल आपटे यांनी केले. देव, घैसास, कीर महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत लोकशाही मूल्यांचे महत्त्व आणि संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली.
भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून महाविद्यालयात संविधानविषयक जागृती निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानातील मूलभूत तत्त्वांची जाणीव करून देणे, अधिकार व कर्तव्यांचे महत्त्व समजावून सांगणे आणि लोकशाही मूल्यांविषयी आदर निर्माण करणे, हा होता.
कार्यक्रमात अनुलोम संस्थेच्या भाग जनसेवक तनया शिवलकर यांनी अनुलोम संस्थेच्या कार्याची माहिती दिली. समाजातील वंचित घटकांसाठी अनुलोम संस्था करत असलेल्या कार्याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये संविधानाची माहितीपर चित्रफीत दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांकडून प्रश्नमंजूषा सोडवून घेण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वसुंधरा जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख मिथिला वाडेकर, कला शाखाप्रमुख ऋतुजा भोवड, विज्ञान शाखाप्रमुख वैभव घाणेकर, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. संविधानाशी संबंधित माहितीपर सादरीकरणांनी कार्यक्रम अधिक समृद्ध झाला. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले. सूत्रसंचालन तन्वी पटवर्धन हिने केले. गौरवी ओळकर हिने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com