घारपी शाळेत ''संविधान सन्मान दिवस''
swt2640.jpg
06899
घारपी ः संविधान दिनानिमित्त येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून जनजागृती केली.
घारपी शाळेत ‘संविधान सन्मान दिवस’
प्रभातफेरीस प्रतिसाद ः जनजागृतीपर घोषणांनी परिसर दुमदुमला
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान सन्मान दिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जाण, लोकशाही मूल्यांबद्दल आदर आणि राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा हेतू होता. कार्यक्रमाची सुरुवात मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘आम्ही भारताचे लोक...’ या शब्दांपासून सुरू होणारी उद्देशिका एकाच स्वरात वाचली. उद्देशिकेतील मूल्यांचा अर्थ, लोकशाहीचे स्वरूप व नागरिकांचे कर्तव्य यांबद्दल शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यादिवशी विद्यार्थ्यांनी गावातून काढलेली संविधान प्रभातफेरी लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, लोकशाही तत्वे यांवरील संदेशफलक हातात घेत गावातील प्रमुख मार्गांनी फेरी काढली. ''आमचे संविधान, आमचा अभिमान'', ''एक देश-एक संविधान'' अशा विविध घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. प्रभातफेरीनंतर विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी एकत्रित येत संविधान एकता साखळी तयार केली. विद्यार्थ्यांनी हातात हात घालून राष्ट्रीय एकता, बंधुभाव आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला. ''विविधतेत एकता'' हा भारतीय संविधानाचा मुख्य आधार आहे, हे प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी दाखवून दिले.
विद्यार्थ्यांची संविधान लेखन स्पर्धा व देशभक्तिपर गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी संविधान दिवसाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना ‘लोकशाहीचे रक्षण हे प्रत्येक नागरिकाचे सततचे कर्तव्य आहे’, असा प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकारी शिक्षक मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, आशिष तांदुळे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

