शेतकऱ्यांची थकबाकी आणि उद्योजकांना कर्जमाफी

शेतकऱ्यांची थकबाकी आणि उद्योजकांना कर्जमाफी

Published on

...अन् उद्योजकांना कर्जमाफी
अबू आझमी ः चिपळूणमध्ये ‘सपा’चे दोघे रिंगणात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ : शेतकरी मेला तर तुमच्या नशिबात एक दाणा नसेल. शेतकऱ्यांची थकबाकी राहिली तर तत्काळ कारवाई केली जाते आणि उद्योजकांना कोटींची कर्जमाफी दिली जाते, असा विरोधाभास समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी चिपळूण येथे सांगितले.
येथील पालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सपाच्या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी चिपळूणमध्ये सभा घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सावंतवाडी येथे अल्पसंख्याक समाजाच्या तरुणाला छळ करून मारले. त्याच्यावर खोटे आरोप करण्यात आले. त्यावर सरकार काही बोलत नाही. देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात द्वेष निर्माण केला जात आहे, असा आरोप अबू आझमी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com