मानवी साखळीतून भारताची प्रतिकृती

मानवी साखळीतून भारताची प्रतिकृती

Published on

swt274.jpg
06980
सावंतवाडीः संविधान दिनानिमित्त कळसुलकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी साखळीने भारताची प्रतिकृती साकारली.

मानवी साखळीतून भारताची प्रतिकृती
सावंतवाडीत संविधान दिनः कळसुलकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ः कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज (ता. २६) माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी संविधान दिन अनोख्या साजरा केला. भारताच्या नकाशाची प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या साखळीने साकारण्यात आली. ही अनोखी संकल्पना शिक्षकांच्या मदतीनेच साकारण्यात आली, यावेळी प्रशालेतील कलाशिक्षक केदार टेमकर तसेच क्रीडा शिक्षिका श्रीमती अल्मेडा, चतुर्थवर्ग कर्मचारी सदानंद जाधव, प्रशालेतील शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.
सुरुवातीला परिपाठाच्या दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे सामूहिक पठण केले. यावेळी मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे यांनी प्रास्ताविकातून संविधान दिन का साजरा केला जातो, संविधानाचे महत्त्व याची माहिती दिली. तसेच सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संविधान दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये प्रशालेतील दुर्वा केसरकर, सानवी सावंत, निष्का नार्वेकर, अनुराग ठाकूर, आर्यन जाधव, पियुष शिर्के, राजदीप बांदेलकर या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रशालेतील शिक्षिका मयुरी मनीष कदम यांनी संविधान व त्याचे महत्त्व विशद केले. एस. जी. सामंत यांनी आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे पर्यवेक्षक एस. एस. वराडकर, एस. एस. चव्हाण, एस. जी. सामंत, एस. पी. कुलकर्णी, एम. आर. घाटवळ, कलाशिक्षक केदार टेमकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com