संक्षिप्त

संक्षिप्त

Published on

सावर्डेत भित्तीपत्रकाचे अनावरण
सावर्डे, ता. २७ ः सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम विद्यालयात संविधान दिन व शहीद दिन संयुक्तरीत्या साजरा करण्यात आला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात प्राणांची आहुती देणाऱ्या सुरक्षादलातील जवानांच्या स्मरणार्थ सादर केलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी सुधीर कदम म्हणाले, हल्ल्यावेळी निःशस्त्र तुकाराम ओंबळे यांच्यासह अनेक धाडसी जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन मुंबईला मोठ्या संकटातून वाचवले, त्या वीरांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी आणि संकटांवर मात करण्याची मानसिकता जोपासावी. तसेच भविष्यातील भारत अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे सांगितले. देशाची आर्थिक राजधानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याने डगमगू न देता भारतीय सुरक्षादलांनी दाखवलेली तत्परता ही पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले. संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संविधान जागृती फेरी, संविधान उद्देशिकेचे समूहवाचन, उद्देशिका शपथ, साखळीवाचन अशा अनेक उपक्रमांद्वारे विद्यार्थी तसेच सावर्डे परिसरातील नागरिकांमध्ये संविधानिक मुल्यांविषयी जनजागृती करण्यात आली. फेरीमध्ये विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


उर्दू हायस्कूलमध्ये
संविधान दिन साजरा
सावर्डे ः संविधान सन्मान समिती जिल्हा रत्नागिरी आयोजित संविधान सन्मानफेरीचे अल् अमीन उर्दू हायस्कूल पोफळी येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी संविधान सन्मान समितीतर्फे मौलाना जमालुद्दीन काद्री, समरीन काद्री, राजे सर, शाहिद खेरटकर मान्यवर उपस्थित होते. या वेळी समरीन काद्री यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. खेरटकर यांनी सदर कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला. संविधान फेरीची सुरुवात पिंपळी मदरसा येथून करण्यात आली. त्यानंतर अल् अमीन उर्दू हायस्कूल पोफळी, पोफळी हायस्कूल, शिरगाव, अलोरे, सती, खेर्डी, छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा चिपळूण व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा बहादूरशेख नाका चिपळूण असे मार्गक्रमण करून रॅलीची समाप्ती करण्यात आली. या प्रसंगी भारतीय शिक्षणसंस्था अध्यक्ष इम्रान अब्बास सय्यद, कासीम खैरदी, इफराज पटेल, मोहसीन पटेल, अब्दुलरहमान नदाफ, परवेझ पटेल, निहाल मुल्लाजी, इसा सय्यद उपस्थित होते. रिझवान पटेल यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com