शिरोडा ग्रंथालयामध्ये उद्या रंगणार चर्चासत्र
शिरोडा ग्रंथालयामध्ये
उद्या रंगणार चर्चासत्र
सावंतवाडीः दिवाळी अंकांना मराठी साहित्यात स्वतंत्र असे मानाचे स्थान आहे. त्या अनुषंगाने आजगाव साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग एकसष्ठाव्या मासिक कार्यक्रमात दिवाळी अंकाविषयी चर्चासत्र आयोजित केले आहे. शनिवारी (ता. २९) सायंकाळी ५ वाजता शिरोडा येथील र. ग. खटखटे ग्रंथालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कट्ट्याचे पाच सदस्य विविध दिवाळी अंकांविषयी बोलतील. त्यानंतर चर्चा होईल. या चर्चासत्राचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.
...................
कारिवडे कालिका देवी
जत्रोत्सव ६ डिसेंबरला
ओटवणेः कारिवडे ग्रामदैवत कालिका अर्थात काळकाई रवळनाथ पावणाई पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबरला होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते. रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गावप्रमुख, देवस्थानचे मानकरी, स्थानिक देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष बाबा गावकर, खजिनदार, मानकरी शुभम गावकर तसेच देवस्थान कमिटी सचिव दत्ताराम गावडे व कारिवडे ग्रामस्थांनी केले आहे.
.....................
सरमळे सातेरीचा
आज जत्रोत्सव
ओटवणेः ओटवणे सरमळे गावचे ग्रामदैवत सातेरी भगवती देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. २८) होणार आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी सातेरी भगवतीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सातेरी भगवतीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थान मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर भाविकांसाठी दर्शन, रात्री सवाद्य पालखी मिरवणूक व मोचेमाडकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी आणि सरमळे ग्रामस्थांनी केले आहे.
....................
बावळाटला उद्या
वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे, ता. २७ ः बावळाटचे ग्रामदैवत सातेरी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी (ता. २९) होणार आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणींची पाठीराखी अशी सातेरी माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सातेरी माऊलीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर उशिरा पार्सेकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभघ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी आणि बावळाट ग्रामस्थांनी केले आहे.
......................
कुडाळात रविवारी
वधू-वर मेळावा
कुडाळः सावंतवाडी संस्थान मराठा समाज (मुंबई) व स्थानिक समिती (कुडाळ) यांच्या वतीने रविवारी (ता. ३०) संस्थेच्या येथील मराठा समाज सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी आर. एल. परब यांच्याशी संपर्क साधावा.
.......................
सातार्डा माऊलीचा
मंगळवारी जत्रोत्सव
सावंतवाडीः साटेली तर्फ सातार्डा येथील स्वयंभू देवी माऊलीचा जत्रोत्सव मंगळवारी (ता. २) होणार आहे. सुवासिनींनी ओट्या भरणे, भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत. रात्री ११ वाजता सवाद्य पालखी प्रदक्षिणा व कलिंगण मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
.......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

