रत्नागिरीत चंपक मैदानावरील कचऱ्याला आग
- rat२७p२.jpg-
२५O०६९४५
रत्नागिरी- शहरातील चंपक मैदानातील डंपिंग ग्राउंडला लागलेल्या आगीचे लोळ आणि धूर.
---
चंपक मैदानावरील कचऱ्याला आग
अग्निशमन यंत्रणेची तत्परता ; मोकाट गुरांचा गोठा सुरक्षित
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : शहरातील चंपक मैदानाजवळ असलेल्या कचरा टाकण्याच्या मैदानावर डंपिंग ग्राउंड) काल (ता. २६) सायंकाळी अचानक आग लागली. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ही आग योग्यवेळी नियंत्रणात आणण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.
चंपक मैदानातील डंपिंग ग्राउंडवर रत्नागिरी शहर आणि परिसरातील कचरा मोठ्या प्रमाणात आणून टाकला जातो. त्याचे व्यवस्थापन होत नसले तरीही फक्त कचरा तिथेच टाकला जात आहे. त्यावर कोणतीही प्रक्रिया होत नाही. त्यामुळे परिसरात कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे. काल सायंकाळी उशिरा अचानक तेथील कचऱ्याला आग लागली. काही क्षणात या आगीने रौद्ररूप धारण केले. सर्वत्र धुराचे लोळ आणि आगीचे लोळ दिसत होत्या. हळूहळू ही आग पसरत गेली. ही बाब पालिकेच्या अग्निशमन दलाला फोनवरून सांगण्यात आली. त्यानंतर तत्परता दाखवत अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. विशेष म्हणजे बाजूला शहरातील मोकाट गुरांच्या आसऱ्यासाठी शेड बांधण्यात आली आहे. तेथे काही जनावरं आणि चारा आहे. आग पसरत तिथपर्यंत पोचली असती तर निवाराशेड आगीत भस्मसात झाली असता; परंतु अग्निशमन दलाने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

