सावंतवाडीत पोलिस दलाचे शक्तिप्रदर्शन
swt2714.jpg
07027
सावंतवाडीः पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिसांनी संचलन केले.
पालिका निवडणुकीसाठी
पोलिस यंत्रणा सज्ज
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ः आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि मतदारांमध्ये निर्भय वातावरणाची खात्री देण्यासाठी येथील पोलिस दलातर्फे बुधवारी (ता. २६) सायंकाळी संचलन (रूट मार्च) करण्यात आले.
हा ‘रूट मार्च’ शहराच्या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला. जगन्नाथराव भोसले उद्यान येथून सुरू झालेला हा रूट मार्च आरपीडी स्कूल, मँगो हॉटेल, जयप्रकाश चौक, गांधी चौक, राऊतपुरम नाका मार्गे पुन्हा नगरपालिका मार्गाने जगन्नाथराव भोसले उद्यानात समाप्त झाला. या संचलनामध्ये सावंतवाडी पोलिस ठाण्याचे चार अधिकारी आणि १५ अंमलदार तसेच दंगल नियंत्रण पथकाचे ४२ अंमलदार आणि पाच होमगार्ड यांचा सक्रिय सहभाग होता. एकूण चार अधिकारी आणि ६२ जवानांनी संचलनात सहभाग घेतला.
जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. नगरपालिका निवडणूक शांततापूर्ण, निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडणे तसेच शहरातील जनतेला सुरक्षिततेची आणि पोलिसांच्या सज्जतेची ग्वाही देणे हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता. कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही, असा संदेश या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आला.
या संचलनामुळे निवडणुकीच्या काळात आवश्यक ती खबरदारी घेतली जात असून, पोलिस दल पूर्णपणे सज्ज असल्याची जाणीव नागरिकांना झाली. सावंतवाडी शहर व परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल कटिबद्ध आहे आणि मतदारांनी कोणत्याही दबावाखाली न येता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

