अन्यायाविऱोधात संविधानिक लढा द्या
swt2716.jpg
07031
इन्सुलीः भीमगर्जना युवक मंडळातर्फे आयोजित संविधान दिन कार्यक्रमास मंचावर धम्मचारी लोकदर्शी अरविंद जाधव, राघोबा जाधव, दीपक जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
अन्यायाविरोधात संविधानिक लढा द्या
अरविंद जाधवः ‘भीमगर्जना’ मंडळातर्फे इन्सुलीत संविधान दिन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ः भारतीय नागरिकांनी संविधानाचे पावित्र्य व मूल्ये टिकण्यासाठी अन्यायाविरुद्ध एकत्र आवाज उठवावा. संविधानिक लढा दिला तरच संविधानाची अंमलबजावणी होऊन लोकशाही टिकून राहू शकेल, असे प्रतिपादन धम्मचारी लोकदर्शी अरविंद जाधव यांनी इन्सुली येथे संविधान दिन कार्यक्रमात केले.
भीमगर्जना युवक मंडळ इन्सुली, रमाईनगर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर इन्सुली येथे बुधवारी (ता. २६) संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विचार मंचावर मंडळाचे सचिव सचिव अरविंद जाधव, सल्लागार राघोबा जाधव, दीपक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राघोबा जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्यास व वृषाली जाधव यांच्या हस्ते विचार मंचावरील भगवान बुध्दांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप आणि धूप प्रज्वलन करून झाली. संविधान प्रतिकृतीचे सविता जाधव व संजना जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सामुदायिक त्रिसरण पंचशील घेऊन कुमारी स्मृतिषा हिने संविधान उद्देशिकेचे वाचन केले.
सपना जाधव, सेजल जाधव, संजना जाधव, सिध्देश जाधव, राघोबा जाधव यांनी आपल्या मनोगतात संविधानाविषयी माहिती दिली. धम्मचारी लोकदर्शी अरविंद जाधव यांनी, सर्व राष्ट्रांमध्ये भारतीय संविधान श्रेष्ठ आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये एकजुटीची प्रेरणा देतात, असे सांगितले.
या कार्यक्रमाला बाबली जाधव, मिथिल जाधव, दीपेश जाधव, तेजस जाधव, स्मिता जाधव, अनुजा जाधव, अनघा जाधव, कृतिका जाधव, सृष्टी जाधव, सानिका जाधव, सुप्रिया जाधव, ललिता जाधव, संपदा जाधव, मनिषा जाधव, लक्ष्मी जाधव, दीपाली जाधव, लैला जाधव, अनुसया जाधव आदी उपस्थिती होते. अरविंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. दीपक जाधव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

