राज्यातील पहिला महिला बचत गट हॉल रत्नागिरीत

राज्यातील पहिला महिला बचत गट हॉल रत्नागिरीत

Published on

rat२७p३.jpg-
२५O०६९४६
रत्नागिरी- महायुतीच्या प्रचारात बोलताना मंत्री उदय सामंत. सोबत डावीकडून सचिन वहाळकर, संपर्कप्रमुख जाधव, राजेंद्र महाडीक, उमेदवार शिल्पा सुर्वे, श्रद्धा हळदणकर, राहुल पंडित, बिपिन बंदरकर, बारक्या हळदणकर आदी.
-----
रत्नागिरीत महिला बचतगट हॉल
उदय सामंत ः मे महिन्यापासून मुंबईसाठी विमानसेवा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : रत्नागिरी शहरात शिक्षण, स्वयंरोजगार, खड्डेमुक्त रस्ते होणार आहेत; परंतु याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी राज्यातील पहिला बचतगटाचा मॉल शहरातील आठवडा बाजार येथे उभारण्यात येत आहे. तसेच मे महिन्यापासून दोन हजार रुपयांत मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याचा मानस पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
शहारतील कॉर्नर सभेत ते बोलत होते. या वेळी संपर्कप्रमुख यशवंत जाधव, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे, श्रद्धा हळदणकर, गणेश भारत, सौरभ मलुष्टे, पूजा पवार, विजय खेडेकर, सायली पाटील आदी उपस्थित होते. महायुतीकडून रत्नागिरी शहरात शक्तीप्रदर्शन सुरू आहे. त्यासाठी विविध ठिकाणी कॉर्नर सभा आयोजित केल्या जात आहेत. रत्नागिरीतील काल (ता. २६) झालेल्या सभेत ते म्हणाले, राज्याचे पहिले कौशल्य केंद्र पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आहे. रत्नागिरीच्या विकासासाठी एका पैशाचीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुंबई महापालिकेत काम केलेल्या यशवंत जाधव यांनी दिली आहे. पुढील दोन महिन्यांत रत्नागिरी शहर खड्डेमुक्त होईल तर वर्षभरात पाणी आणि विजेचा प्रश्न पूर्णपणे सोडवला जाईल. महिला बचतगटांना न्याय देण्यासाठी आठवडा बाजारात महाराष्ट्रातील पहिला बचतगटाचा मॉल उभारण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com