अपक्षांच्या कामगिरीवर प्रस्थापितांचे भवितव्य
अपक्षांवर प्रस्थापितांचे भवितव्य
खेड नगरपालिका ; शिट्टी, बॅट निशाणीचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २७ : खेड नगरपालिकेतील अपक्षांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अपक्ष उमेदवारांचा प्रचार खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. खेडमध्ये २० सदस्यांपैकी प्रस्थापित पक्षाच्या पाच उमेदवारांना पाच अपक्षांचे कडवे आव्हान उभे आहे.
अपक्ष उमेदवारांचा युतीच्या की, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फटका बसणार, याबाबत अंदाज बांधले जात आहेत. अपक्षांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारांमध्ये प्रभाग क्र. २ ब मधील अनिल मोरे व प्रभाग क्र. ६ ब मधील भूषण काणे तर प्रभाग क्र. ७ ब मधील कौसर मुजावर या सर्वांना शिट्टी निशाणी मिळाली आहे तर प्रभाग ७ ब मधील श्रद्धा कवळे यांची निशाणी नारळाची बाग आहे. प्रभाग क्र. १० ब मधील दानिश मणियार यांना बॅट निशाणी मिळाली आहे. त्यामुळे या पालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराच्या रणधुमाळीमुळे प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना आपली जागा राखण्यासाठी शिकस्त करावी लागणार, हे मात्र निश्चित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

