क्राईम

क्राईम

Published on

‘त्या’ तरुणावर
उपचार सुरू
रत्नागिरी ः कळंबणी (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल केलेल्या तरुणाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महेंद्र सीताराम पिरंदणकर असे जखमी तरुणाचे नाव आहे. मंगळवारी (ता. २५) रात्री दहाच्या सुमारास कळंबणी येथील १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र हा खेड रेल्वेस्टेशन येथे बेशुद्धावस्थेत सापडला. जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जखमी तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३५ आहे. त्याच्या उजव्या व डाव्या हातावर टॅटू, उजव्या हातात तांब्याचे कडे तसेच मानेवर टॅटू आहे; मात्र या तरुणाचे कोणही नातेवाईक नाहीत. या तरुणाची माहिती मिळाल्यास येथील शहर पोलिस ठाणे अथवा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिसचौकीत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दारू विकणाऱ्या
महिलेवर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील साठरेबांबर-बौद्धवाडी येथील पायवाटेवर हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २६) रात्री पावणेनऊच्या सुमारास साठरेबांबर-बौद्धवाडी येथील नथुराम सावंत यांच्या जुन्या घराजवळ पायवाटेवर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित महिला विनापरवाना हातभट्टीची गावठी दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगलेल्या स्थितीत सापडली. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार तृप्ती सावंतदेसाई यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com