शिरगाव, जामसंडे हायस्कूल खो-खो स्पर्धेत अव्वल
swt281.jpg
07126
वाडा : येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
शिरगाव, जामसंडे हायस्कूल
खो-खो स्पर्धेत अव्वल
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २८ः तालुक्यातील वाडा येथील अ. कृ. केळकर हायस्कूलच्या क्रीडांगणावर आयोजित तालुकास्तरीय खो -खो स्पर्धेत मुलांमधून शिरगाव हायस्कूल तर मुलींमधून जामसंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
दीक्षित फाऊंडेशन पुरस्कृत ही स्पर्धा वाडा येथील केळकर हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात आली होती.
स्पर्धेचे उद्घाटन दीक्षित फाऊंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, शाळा समिती अध्यक्ष हर्षद जोशी, स्थानीय समिती अध्यक्ष शांताराम पुजारे, स्थानीय समिती कार्यवाह दिनकर जोशी, स्थानीय समिती सदस्य रामकृष्ण परब, मुख्याध्यापिका स्मिता तेली, वाडा केंद्रप्रमुख जयदेव सारंग, खो-खो फेडरेशनचे उपाध्यक्ष श्री. फणसेकर आदी उपस्थित होते. तर स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार ॲड. अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी हर्षद जोशी, उत्तरेश्वर लाड, नीलेश तिर्लोटकर, सचिन मोरे यांनी मेहनत घेतली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा, मुलगे -शिरगाव हायस्कूल, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सौंदाळे -बाऊळवाडी, बापर्डे हायस्कूल, वाडा हायस्कूल, मुली -जामसंडे हायस्कूल, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सौंदाळे बाऊळवाडी, सौंदाळे हायस्कूल, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पुरळ कळंबई. सर्वोत्तम खेळाडू -किंजल संतोष अदम, सर्वोत्तम बचाव -वेदांत मंगेश घाडी,
सर्वोत्तम आक्रमण -श्रावणी शशिकांत वाडेकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

