-भगवान परशुराम व्याख्यानमाला उत्साहात

-भगवान परशुराम व्याख्यानमाला उत्साहात

Published on

‘चित्पावन’ मंडळात तीन दिवस ज्ञानोत्सव
भगवान परशुराम व्याख्यानमाला ; श्रोत्यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे भगवान परशुराम व्याख्यानमाला गेले तीन दिवस भगवान परशुराम सभागृह, ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृह, जोशी पाळंद येथे जाणकार श्रोत्यांच्या उपस्थितीत उत्साहात झाली. शुक्रवारी (ता. २१) नोव्हेंबरला सायंकाळी पाच ते सात या वेळेत डोंबिवली येथील प्रसिद्ध वक्ते विशाल कवीश्वर यांचे ज्ञानेश्वरांचे पसायदान या विषयावर व्याख्यान झाले.
ज्ञानेश्वरीमधील पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरांनी विश्वशांतीसाठी केलेली प्रार्थना एवढंच आपल्याला माहीत आहे; पण कवीश्वर यांनी पसायदान याचा गर्भितार्थ सांगितला. याचना आणि प्रार्थना यातील फरक आई, माता, माऊली यातील फरक, आनंद, गंधर्व, परमानंद, ब्रह्मानंद यांचा १०० पटीने गुणून प्राप्त होणारा पायरी पायरीने चढत जाणारा आनंद हे पदर त्यांनी उलगडून दाखवले.
२२ला मुंबईचेच वक्ते चंद्रशेखर वझे (सीए) यांचे ‘अपरिचित रामायण’ या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानातून त्यांनी वाल्मीकी रामायणातील सर्वसामान्यपणे लोकांना माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या. श्री वाल्मीकी कोण होते, त्यांनी रामायण कशासाठी लिहिले आपल्याला माहीत नसलेल्या कोणत्या गोष्टी रामायणात आहेत. श्रीरामाचे प्रशासन कसे होते, रामराज्य का म्हणायचे, रामायणातून नेमके काय शिकायचे इत्यादींबाबत त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. २३ला मुंबईचेच वक्ते सतीश जोशी यांचे छत्रपती शिवाजी महाराज-दी मॅनेजमेंट गुरू या विषयावर दृकश्राव्य पद्धतीने व्याख्यान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com