आरोस गिरोबाचा आज जत्रोत्सव
swt283.jpg
07156
आरोस ः श्री देव गिरोबा.
आरोस गिरोबाचा आज जत्रोत्सव
आरोंदा, ता. २८ ः येथील श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता.२९) साजरा होणार आहे. यानिमित्त दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी श्रींची पुजाअर्चा, अभिषेक होईल. त्यानंतर भाविक भक्तांसाठी केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, गाऱ्हाणे आदी कार्यक्रमांना सुरूवात होईल. रात्री देवाची सवाद्य पालखी प्रदक्षिणा त्यानंतर रात्रौ वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी या जत्रौत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन आरोस मानकरी व ग्रामस्थांन केले आहे.
---------------
swt286.jpg
07157
साळीस्ते ः येथील जिल्हा परिषद शाळेची गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायत साळिस्तेने शाळेच्या भौतिक सुविधांची पूर्तता केली आहे.
साळिस्ते क्रमांक १ मध्ये
ग्रामपंचायतर्फे भौतिक सुविधा
तळेरे, ता. २८ ः साळिस्ते येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांची पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायत साळिस्तेने पुढाकार घेत महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने ग्रामपंचायतीचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. शाळेतील किचन शेडसाठी नवीन पत्रे बसविण्यात आली असून, पिण्याच्या पाण्यासाठी एक हजार लिटर क्षमतेची टाकी बसविण्यात आली आहे. त्यामुळे क्रीडा महोत्सवासाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना पाण्याची उत्तम व्यवस्था उपलब्ध होणार आहे. नवीन शौचालयाचे बांधकामही अंतिम टप्प्यात आले आहे. क्रीडा स्पर्धेसाठी नियोजन म्हणून ग्रामपंचायतीने तीन हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्याध्यापक संजना ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केली. सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, ग्रामपंचायत अधिकारी विशाल वरवडेकर, डाटा ऑपरेटर प्रशांत बारस्कर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर ताम्हणकर व उपाध्यक्ष गजानन रामाणे यांनी आभार मानले.

