रत्नागिरी-आदित्य, स्वरा, सार्था, हर्ष, अंतिम फेरीत

रत्नागिरी-आदित्य, स्वरा, सार्था, हर्ष, अंतिम फेरीत

Published on

rat28p1.jpg-
7123
आदित्य लिमये, स्वरा भागवत, सार्था गवाणकर, हर्ष बोंडाळे
----------
आदित्य, स्वरा, सार्था, हर्ष
सुगम संगीत स्पर्धेत अंतिम फेरीत
रत्नागिरी, ता. २८ : नवोदित गायक कलाकारांसाठी दरवर्षी होणाऱ्या दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राची आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेची रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी झाली. या केंद्रातून आदित्य, स्वरा, हर्ष आणि सार्था हे चौघे मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. खल्वायन संस्थेतर्फे आयोजित प्राथमिक फेरीत राजापूर, चिपळूण, देवगड, संगमेश्वर, रत्नागिरी येथील महाविद्यालयांमधून १८ स्पर्धक सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेतून आदित्य लिमये (वि. स. गांगण महाविद्यालय, रत्नागिरी), स्वरा भागवत (टी. पी. केळकर सायन्स ज्युनिअर कॉलेज, रत्नागिरी), हर्ष बोंडाळे आणि सार्था गवाणकर (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी या स्पर्धकांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेचे परीक्षण राम तांबे आणि अनिता आगाशे यांनी केले. स्पर्धेकरिता प्रथमेश शहाणे (तबला) आणि मंगेश मोरे (संवादिनी) यांनी संगीतसाथ केली. या वेळी अभिनेते आणि दादर-माटुंगा केंद्राचे कार्यवाह सतीश जोशी हे उपस्थित होते. स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात ११ जानेवारीला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com