तारकर्लीचे केरकर दिसणार
क्रिकेटच्या राष्ट्रीय मैदानावर

तारकर्लीचे केरकर दिसणार क्रिकेटच्या राष्ट्रीय मैदानावर

Published on

07207

तारकर्लीचे केरकर दिसणार
क्रिकेटच्या राष्ट्रीय मैदानावर

‘आयएससीएल’ पंचपदी निवड

मालवण, ता.२८ : तारकर्ली (ता.मालवण) येथील गोविंद उर्फ बंटी केरकर यांची बंगळूर येथे आयोजित ‘आयएससीएल’ या राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे. ही स्पर्धा १ डिसेंबर ते २१ डिसेंबर होणार आहे.
बंगळूर येथील प्रसिद्ध किणी स्पोर्ट्स मैदान येथे सामने होतील. स्पर्धेत भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधून ३२ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला तब्बल १ कोटी रुपयांचे रोख बक्षीस आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि ‘मिस्टर आयपीएल’ या नावाने क्रिकेट जगतात प्रसिद्ध असणारे सुरेश रैना हे या स्पर्धेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. श्री. केरकर यांना राष्ट्रीय स्तरावर काम करताना पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com