दोन माजी नगराध्यक्ष, पाच नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला

दोन माजी नगराध्यक्ष, पाच नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला

Published on

प्रचाराला वेग; जुन्या दिग्गजांची टक्कर
लांजा नगरपंचायत; काँग्रेस, शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २८ ः नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. थेट मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या पक्षाचे चिन्ह, आपल्याला मिळालेले चिन्ह लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रत्येक उमेदवाराचा खटाटोप सुरू आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत दोन माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह पाच माजी नगरसेवक पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
आपणच शहराचा कसा विकास करू शकतो, शहराचा चेहरामोहरा कसा बदलू शकतो, लोकाभिमुख कारभार कसा केला जाऊ शकतो? हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न महायुती, महाविकास आघाडीबरोबरच अपक्ष उमेदवारांकडून केला जात आहे.‌ माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत हे महायुतीचे उमेदवार म्हणून प्रभाग क्र. १५ मधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाकडून यापूर्वी उपनगराध्यक्ष तसेच माजी नगरसेवक असलेल्या पूर्वा मुळे पुन्हा एकदा रिंगणात उतरल्या आहेत. या वेळी त्या शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून नशीब आजमावण्यासाठी रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या वेळी त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
याचबरोबर या निवडणुकीमध्ये पाच माजी नगरसेवक पुन्हा एकदा आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.‌ मागील वेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या मात्र महायुतीत सहभागी असलेल्या मधुरा मिलिंद लांजेकर या पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना पक्षाकडून अधिकृत तिकीट मिळालेले नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक दहामधून त्या अपक्षपणे उभ्या आहेत.‌ या ठिकाणी त्यांना अन्य तुल्यबळ उमेदवारांशी सामना करावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक सातमधून भाजपच्या बंडखोर उमेदवार, माजी नगरसेविका शीतल सावंत या अपक्षपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिवसेना भाजप महायुतीत त्यांना ही जागा सोडण्यात न आल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्षपणे निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रभाग क्र. ९ मधील लढत ही विशेष लक्षवेधी ठरणार आहे. या ठिकाणी दोन्ही माजी नगरसेवक यामध्ये दिलीप मुजावर आणि रफिक नेवरेकर यांच्यात कडवी लढत होणार आहे.‌ माजी नगरसेवक असलेले दिलीप मुजावर यांनी या वेळी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवारी दाखल केली आहे. याच मतदार संघातून गतवेळचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेले रफिक नेवरेकर यांनी अपक्षपणे निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्र. १२ मधून वंदना काडगाळकर या माजी नगरसेविका पुन्हा एकदा रिंगणात आहेत. गतवेळी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या वंदना काडगाळकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडाचा झेंडा उभारत अपक्षपणे रिंगणात उतरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com