नगर राजभाषा कार्यान्वयन समितीची बैठक
-rat28p24.jpg-
P25O07223
रत्नागिरी : नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्या हिंदी पत्रिका राजभाषा रत्नसिंधुचे प्रकाशन करताना मान्यवर.
----
‘नगर राजभाषा कार्यान्वयन’ समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : नगर राजभाषा कार्यान्वयन समितीची सहामाही बैठक नुकतीच न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. च्या संमेलन कक्षात झाली. समितीद्वारे सहामाही हिंदी पत्रिका राजभाषा रत्नसिंधुचे प्रकाशन करण्यात आले.
सभेला प्रमुख अतिथी म्हणून गृहमंत्रालय राजभाषा विभागाकडून सहाय्यक निदेशक प्रमोद सांगोळे, बँक ऑफ इंडिया, प्रधान कार्यालयातून सहाय्यक महाप्रबंधक मऊ मैत्रा उपस्थित होते. शहरातील केंद्र सरकारी कार्यालयामध्ये राजभाषा हिंदीचा प्रचार प्रसार करण्यासाठी गृहमंत्रालय, राजभाषा विभागाने नगर राजभाषा कार्यान्वयन समितीची स्थापना केली आहे. समितीच्या आयोजनाचे कार्य बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालयास दिले आहे. अध्यक्षस्थानावरून नरेंद्र देवरे यांनी सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या अंतर्गत कामकाजामध्ये हिंदीचा अधिकाधिक वापर करावा व केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करावे व ग्राहक तथा जनतेसंबंधी कामकाजात क्षेत्रीय भाषा म्हणून मराठी भाषेचा वापर करावा, असे सांगितले. समितीमध्ये ३० केंद्र सरकारी कार्यालये एकत्रित कार्य करतात. बैठकीचे नियोजन रत्नसिंधुचे सदस्य सचिव रमेश गायकवाड यांनी पाहिले. या वेळी पुरस्कार वितरण करण्यात आले. या प्रसंगी न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे आशुतोष शिवपुरे, उपमहानिरीक्षक टी. एन. उपाध्याय, भारतीय तटरक्षक एअरस्टेशन, सहाय्यक निदेशक, कोकण रेल्वेचे विभागीय प्रमुख शैलेश बापट उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

