खेड -आगारात सहलींसाठी बस आरक्षणाचा धडाका

खेड -आगारात सहलींसाठी बस आरक्षणाचा धडाका

Published on

खेडमधून सहलींसाठी
१५ फेब्रुवारीपर्यंत गाड्या फुल्ल
खेड, ता. २८ : खेड आगार शालेय सहलींच्या हंगामासाठी पूर्णपणे सज्ज झाले असून, गेल्या १५ दिवसांपासून सहलींसाठी विशेष एसटी बसफेऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. शालेय संस्था आणि महाविद्यालयांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे दररोज ४ विशेष फेऱ्या चालवल्या जात आहेत. या सर्व फेऱ्या १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे आरक्षित झाल्याची माहिती आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिली.
सहलींचा हंगाम सुरू होताच एसटी बसना संस्थांकडून मोठी मागणी येऊ लागली आहे. आगारातून गेल्या १० दिवसांपासून सहलींसाठी विशेष फेऱ्या नियोजनबद्धरित्या धावत असून, बस उपलब्धता कमी पडू नये यासाठीही विशेष ध्यान देण्यात येत आहे. सहलींच्या फेऱ्यांमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. सध्या लग्नसोहळ्यांचा हंगामही सुरू असल्याने, विवाहसोहळ्यांसाठीही बसफेऱ्यांची मागणी वाढली आहे. या मागणीनुसार, खेड आगाराकडून विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे राजेशिर्के यांनी स्पष्ट केले. शालेय सहलींसोबत लग्नसोहळ्यांसाठीही मागणीनुसार बसेस देण्यात येत आहेत. हंगामभर ही सेवा उपलब्ध राहील, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com