रहदारीस अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल

रहदारीस अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल

Published on

रहदारीस अडथळा
प्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर ते मजगाव रोड जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर वाहन पार्क करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. महेश भिकाभाई सलाट (वय ३०, रा. कच्ची निवास, सारसा, आनंद, राज्य गुजरात) असे सार्वजनिक रस्त्यावर वाहन पार्क करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास मारुती मंदिर ते मजगाव रोडकडे जाणाऱ्या सार्वजिक रस्त्यावरील हॉटेल गोपाळ येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित महेश सलाट याने मोटार (जीजे २३ एडब्ल्यू २२५९) सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशी पार्क केली.
---------------
सार्वजनिक ठिकाणी
मद्यपान प्रकरणी गुन्हा
रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे - सनगरे स्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या वृद्धाविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश बाबू ठोंबरे (वय ६४, रा. कोतवडे, सनगरेवाडी, रत्नागिरी) असे संशयित वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोतवडे, सनगरे स्टॉप रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठोंबरे हे सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करत असताना निदर्शनास आले. याप्रकरणी सहायक पोलिस फौजदार मनोज पावसकर यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
--------------
मुर्शी वाणीवाडी रस्त्यावर
अपघातात तिघे जखमी
रत्नागिरी : साखरपा (ता. संगमेश्वर) येथील मुर्शी वाणीवाडी रस्त्यावर दुचाकी घसरली. या अपघातात तिघे जण किरकोळ जखमी झाले. उपचारासाठी त्यांना साखरपा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २८) सकाळी आठच्या सुमारास मुर्शी-वाणीवाडी रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वार संतोष धोंडू फोंडे (वय ३४, रा. साखरपा, संगमेश्वर) हे दुचाकी घेऊन दख्खन ते साखरपा असे येत असताना मुर्शी-वाणीवाडी रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली. या अपघातामध्ये फोंडे व त्यांची पत्नीही किरकोळ जखमी झाली; मात्र सोबत असलेला त्यांचा लहान मुलगा देवांश याच्या डोक्याला मार लागला. तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय साखरपा येथे दाखल केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com