रत्नागिरी जिल्ह्यातील 1,749 ग्राहकाना शॉक
जिल्ह्यातील १,७४९ ग्राहकांना शॉक
थकित वीज बिल : सिंधुदुर्गातील ग्राहकांवरही महावितरणची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित न करणाऱ्यांना महावितरणने शॉक दिला आहे. वीजबिल थकविणाऱ्या तीन हजार २१ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ७४९, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ हजार २७२ ग्राहकांचा समावेश आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.
रत्नागिरी परिमंडळांतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील १ लाख ७२ हजार १८१ ग्राहकांकडे ३७ कोटी ५१ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील १ लाख ४९ हजार २२८ घरगुती ग्राहकांकडे २२ कोटी ९२ लाख, व्यावसायिक १४ हजार ८५२ ग्राहकांकडे ७ कोटी ६२ लाख, औद्योगिक २ हजार १७६ ग्राहकांकडे ३ कोटी ९३ लाख, सार्वजनिक सेवा वर्गवारीतील ५ हजार ५३३ ग्राहकांकडे २ कोटी ६९ लाख आणि इतर वर्गवारीतील ३९२ ग्राहकांकडे ३४ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. थकीत बिलांची वसुली करण्यासाठी महावितरणकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाईन पद्धतीने वीज बिलाचा भरणा करता येतो. ग्राहकांना देय रकमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीज बिलावर उपलब्ध आहे.
थकबाकीदार वीजग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी, कणकवलीमध्ये सर्वाधिक
घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीत रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहर विभागात एकूण ४४ हजार ३३० ग्राहकांकडे ८ कोटी ७९ लाख, खेड विभागात २७ हजार १४३ ग्राहकांकडे ५ कोटी २ लाख, चिपळूण विभागात २४ हजार ७२८ ग्राहकांकडे ४ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात ३६ हजार ७८६ ग्राहकांकडे ८ कोटी ८२ लाख, कुडाळ विभागात ३९ हजार १९४ ग्राहकांकडे १० कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

