ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या मॅनेजरकडून ट्रक चालकाला मारहाण
ट्रान्स्पोर्ट व्यवस्थापकाची
ट्रक चालकाला मारहाण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ः शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळील चहाच्या टपरीवर ट्रक चालकांचा किरकोळ कारणातून वाद झाला. या वादावादीत एका ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकाने ट्रक चालकाच्या नाकावर बुक्का मारून दुखापत केली. रक्तबंबाळ झालेल्या चालकाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
यदुनाथ बाईंग असे संशयित व्यवस्थापकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २८) दुपारी साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळील चहाच्या टपरीवर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जखमी चालक सतीश बब्रुवान नायकवडी (वय ५५, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) हे जलतरण तलाव येथे चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले होते. त्या वेळी ट्रान्स्पोर्ट कंपनीचा व्यवस्थापक व दुसरा ट्रकचालक महेश घाटगेही होते. या दोघांमध्ये जमिनीच्या व्यवहारावरून चर्चा सुरू होती. त्या वेळी जखमी सतीश नायकवडी यांनी जमीन त्याच्या नावावर करून द्या, असा सल्ला दिला. या कारणावरून संशयित यदुनाथ बाईंग यांनी ट्रकचालक सतीश नायकवडी यांना मारहाण केली. याची नोंद जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. जखमी सतीश नायकवडी हे रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

