मूल्यवर्धित पदार्थांचे प्रशिक्षण
महिलांना मूल्यवर्धित
पदार्थांचे प्रशिक्षण
रत्नागिरी ः कोकणात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतीतील उत्पादन कच्चा माल म्हणून न विकता त्यावर प्राथमिक प्रक्रिया करून पक्का माल म्हणजे मूल्यवर्धित पदार्थ तयार करावेत. शेती फायदेशीर होण्यासाठी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. महिला शेतकऱ्यांना मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यापिठामार्फत दिले जाईल. मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी विद्यापीठ महिला शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. भावे यांनी शेतकरी उत्पादन कंपनीच्या सदस्यांना केले. शहराजवळील शिरगाव पंचक्रोशीत रत्नसागर शेतकरी उत्पादक कंपनी (एफ.पी.सी.) स्थापन करण्यात आली आहे. कंपनीच्या महिला शेतकरी सदस्यांना काही व्यावसायिक आणि तांत्रिक समस्या भेडसावत होत्या. त्या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी महिला शेतकरी सदस्यांनी मत्स्य अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मदतीने कुलगुरू डॉ. भावे यांची मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन- शिरगाव येथे सदिच्छा भेट घेतली.
विद्यार्थ्यांना एआय
ॲपद्वारे माहिती
मंडणगड ः लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने कृषी विभागाच्या अॅपवरील विविध योजना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख डॉ. भरतकुमार सोलापुरे आदी उपस्थित होते. मंडणगड कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचा महाविस्तार एआय अॅप विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर डाउनलोड करून देत संबंधित नोंदणी पूर्ण केली. यानंतर तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर यांनी अॅपवर उपलब्ध असलेल्या शासनाच्या विविध कृषी योजनांची आणि सेवांची सविस्तर माहिती दिली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

