सावंतवाडीतून ‘कोकण ट्रेल’चा प्रारंभ

सावंतवाडीतून ‘कोकण ट्रेल’चा प्रारंभ

Published on

07362


सावंतवाडीतून ‘कोकण ट्रेल’चा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २९ ः सिंधुदुर्ग ग्रीन ट्रेल फाउंडेशन व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वॉकाथॉन कोकण ट्रेल-२०२५’ या स्पर्धेचा प्रारंभ शुक्रवारी (ता. २८) पहाटे साडेपाचला जिमखाना, सावंतवाडी येथे करण्यात आला.
या स्पर्धेसाठी ओटवणे येथे चेक पॉईंट उभारण्यात आला. याचे संपूर्ण नियोजन रणझुंजार ३८+ ग्रुपकडून करण्यात आले. हा ट्रेल १०० किलोमीटर अंतराचा असून तो ५० तासांत पूर्ण करायचा आहे. तसेच ५० किलोमीटर फॉरमॅट देखील उपलब्ध आहे, जो २५ तासांत पूर्ण करायचा आहे. यासाठी देशभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा उद्या (ता. ३०) तिसऱ्या दिवशी याच ठिकाणी समारोप होणार आहे. ‘वॉकाथॉन’चा मार्ग सावंतवाडी, चराठे, कारीवडे, माडखोल, सरमळे, वेत्ये, न्हावेली, पेंडूर, मातोंड, तुळस, अणसूर, परबवाडा, उभादांडा, सागरेश्वर, वेतोरे, वजराठ, मळगाव आणि सावंतवाडी असा आहे. या ‘वॉकाथॉन’च्या प्रत्येक १० किलोमीटरवर बावळाट, ओटवणे, माजगाव, सोनुर्ली, तुळस, वेंगुर्ले, खानोली, आडेली, नेमळे, सावंतवाडी या दहा ठिकाणी चेकपॉईंट असून त्या ठिकाणी वैद्यकीय मदत, पाणी, अन्न व सुरक्षेची व्यवस्था केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com