पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये नेमळे प्रशाळेचा दबदबा
07365
पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये
नेमळे प्रशाळेचा दबदबा
सावंतवाडी ः क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्ग तसेच अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा (ता. देवगड) यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत हायस्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी विद्यालयाच्या खेळाडूंनी यश मिळविले. यात १७ वर्षांखालील मुलांच्या गटात रोहन गावडे याने ६६ किलो ग्रॅम गटात प्रथम क्रमांक, हार्दिक धोंड याने ८३ किलो गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. या दोन्ही खेळाडूंची विभागस्तरावर निवड झाली आहे. लोचन कोळगे हा ५९ किलो वजन गटात द्वितीय आला. यशप्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, प्रा. कल्पना बोवलेकर यांनी अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक आर. के. राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
---
07364
‘मंत्रभूल’ला अनंत काणेकर पुरस्कार
मालवण : कोकण मराठी साहित्य परिषदेचा मानाचा ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार येथील ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांच्या ‘मंत्रभूल’ साहित्यकृतीस प्राप्त झाला आहे. ‘कोमसाप’ कुडाळ शाखेतर्फे ७ डिसेंबरला आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळावा तसेच ‘भाकरी आणि फूल’ कवी संमेलन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे सकाळी सव्वादहाला कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ‘कोमसाप’ कुडाळ शाखाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

