कणकवली विकासाचा दुसरा टप्पा महत्त्वाचा

कणकवली विकासाचा दुसरा टप्पा महत्त्वाचा

Published on

07370
कणकवली ः शहरातील विद्यानगर येथील प्रचारसभेत बोलताना पालकमंत्री नीतेश राणे. बाजूला मेघा गांगण, राजश्री धुमाळे, डॉ. संदीप नाटेकर, विशाल कामत.

कणकवली विकासाचा
दुसरा टप्पा महत्त्वाचा

नीतेश राणे ः कणकवलीत भाजपची सभा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २९ ः शहरात पायाभूत सुविधांचे जाळे आम्‍ही पूर्ण केले. आता विकासाचा दुसरा टप्पा महत्त्‍वाचा आहे. अद्ययावत भाजी मार्केट, भुयारी गटार योजना, पार्किंग, भव्य स्टेडियम आदी कामे पाच वर्षांत पूर्ण करणार आहोत, अशी ग्‍वाही पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
शहरातील विद्यानगर येथे पालकमंत्री राणे यांची सभा झाली. यावेळी मेघा गांगण, राजश्री धुमाळे, डॉ. संदीप नाटेकर, प्रकाश सावंत, विशाल कामत उपस्थित होते. राणे म्‍हणाले, ‘मी आमदार असताना कणकवलीसाठी निधी आणला. त्‍यात पायाभूत सुविधांची कामे झाली. आता तर कॅबिनेटमंत्री आहे. त्‍यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेले भव्य स्टेडियम, भाजी मार्केट, सुसज्‍ज उद्यान, पार्किंग व्यवस्था आदींची कामे निश्‍चितपणे पाच वर्षांत मार्गी लागणार आहेत. शिवाय शहरातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठीही नवीन उपक्रम राबवले जाणार आहेत. कणकवली शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यटननगरी बनविण्याची जबाबदारी मी घेतली आहे.’
विद्यानगर येथील गंगाराम सावंत यांच्या निवासस्थानी झालेल्‍या सभेवेळी श्री. राणे यांच्यासोबत प्रभाग पाचमधील भाजपच्या उमेदवार मेघा गांगण यांच्यासह राजश्री धुमाळे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, प्रकाश सावंत, विशाल कामत, डॉ. संदीप नाटेकर, बंडू गांगण, पंढरी वायंगणकर, ॲड. राजू परुळेकर, बबलू सावंत, सुशील पारकर, राजन परब, गंगाधर सावंत, प्रियाली कोदे, राजू बागवान, राजश्री रावराणे, भाग्यलक्ष्मी साटम, सुधीर वालावलकर, उत्तम ताह्मणकर उपस्थित होते.
------------------
07371
कणकवली ः शहरातील तेलीआळी येथील सभेत बोलताना आमदार नीलेश राणे. बाजूला राजन तेली, संजय आंग्रे, सतीश सावंत, प्रांजली आरोलकर.

कणकवली शहराच्या सर्वांगीण
विकासाची माझी जबाबदारी

नीलेश राणे ः तेलीआळीत ‘आघाडी’ची सभा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २९ ः कणकवली शहराच्या सर्वंगीण विकासाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. आमचे विकासाचे व्हिजन स्पष्‍ट आहे. नगरविकास खात्‍याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लागेल तेवढा निधी कणकवली शहरासाठी आणला जाईल, अशी ग्‍वाही आमदार नीलेश राणे यांनी दिली.
शहरातील तेलीआळी येथे शहर विकास आघाडीची सभा झाली. या सभेत आमदार राणे यांनी मार्गदर्शन केले. ते म्‍हणाले, ‘पाच वर्षे शहरात सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांना शहरात साधी सांडपाणी व्यवस्था करता आली नाही की भाजीमार्केट ताब्‍यात घेता आले नाही. आता नगरविकास खात्‍याच्या माध्यमातून आम्‍ही शहर विकासामधील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करणार आहोत. शहरात सत्ताधाऱ्यांनी भय आणि भ्रष्‍टाचाराची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ती मोडीत काढण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून शहरवासीयांना मिळाली आहे. कणकवली नगरपंचायत हे एक मंदिर आहे. या मंदिराची पवित्रता जपणे, ही शहरवासीयांची जबाबदारी आहे.’
शहर विकास आघाडीच्या प्रभाग १२ मधील उमेदवार प्रांजली आरोलकर यांच्या प्रचारासाठी आमदार राणे यांनी ही सभा घेतली. यावेळी माजी आमदार राजन तेली, शिंदे शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे, ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी नगरसेविका वैशाली आरोलकर, उमेदवार प्रांजली आरोलकर यांसह मोतिराम पाताडे, वैभव आरोलकर, हर्षा नेरकर, प्रदीप आरोलकर, शैलेंद्र नेरकर, नारायण आरोलकर, उमेश आरोलकर, संजय मालंडकर, अवधूत आंबळकर, रमेश काळसेकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com