बांदा केंद्रशाळेस सर्वसाधारण विजेतेपद

बांदा केंद्रशाळेस सर्वसाधारण विजेतेपद

Published on

07414

बांदा केंद्रशाळेस सर्वसाधारण विजेतेपद

बाल क्रीडा महोत्सव; विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी चमकले

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३० ः बांदा केंद्रात आयोजित ‘बाल कला क्रीडा, ज्ञानी मी होणार महोत्सव २०२५’ मध्ये पीएमश्री बांदा क्रमांक १ या शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय खेळ कौशल्यासोबतच शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे शाळेने हे यश मिळविले.
या स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी यश मिळविले. लहान गटाचा निकाल असा ः १०० मीटर धावणे-शेखर बांदेकर(प्रथम), विधी वासानी (द्वितीय). ५० मीटर धावणे-अन्वी शिंदे (द्वितीय), लांब उडी-सीताराम परब (द्वितीय), उंच उडी-साईश गुळेकर (प्रथम), वसंत कामटेकर (द्वितीय). मोठ्या गटातील निकाल-१०० मीटर धावणे-शुभम झोरे (प्रथम), ऐश्वर्या पुजीर (द्वितीय), २०० मीटर धावणे-अमृता मिराशी (प्रथम). लांब उडी-आजम खान (प्रथम).
संघ स्पर्धांचे निकाल ः खो-खो (मोठा गट)-मुलगे व मुली विजेते, खो-खो (लहान गट)-मुलगे व मुली विजेते, कबड्डी (मोठा गट)-मुली विजेता संघ. ४×५० मीटर रिले स्पर्धा (लहान गट)-मुलगे व मुली विजेते, ४×१०० मीटर रिले स्पर्धा (मोठा गट)- मुलगे व मुली विजेते. ज्ञानी मी होणार-मोठा व लहान गट विजेता. समूहगीत-लहान व मोठा गट विजेता. या सर्व यशात शाळेच्या शिक्षकवर्गाचे मोलाचे योगदान लाभले. शिक्षक शांताराम असनकर, रंगनाथ परब, श्री. फर्नांडिस, अर्चना देसाई, मनीषा मोरे, कृपा कांबळे, स्नेहा घाडी, शिल्पा ठाकर व प्रसेनजित बोचे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com