आठ वर्षात चिपळूण पालिका भकास

आठ वर्षात चिपळूण पालिका भकास

Published on

चिपळूण पालिका आठ वर्षात भकास
रमेश कदम ः निवडणुकीत परिवर्तनाची लाट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ ः पालिकेची निवडणूक १९९५ नंतर कधी लढली नाही. गेल्या आठ वर्षात पालिकेची अवस्था भकास झाली आहे. नवीन प्रकल्प नाहीत. निधीचा वारेमाप गैरवापर होतोय. प्रशासनावर कसलाही अंकुश नाही. याविषयी राजकीय विरहित मंडळींनी नगराध्यक्षपदासाठी लढण्याचा आग्रह केल्याने यात उतरलो. या निवडणुकीत परिवर्तनाची लाट आहे, ते मतमोजणीत दिसून येईल, असा विश्वास, आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.
चिपळूण पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार सभेवेळी रमेश कदम म्हणाले, आमदार भास्कर जाधव व राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने शहरात चांगला प्रतिसाद आहे. कोणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. गेल्या ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत समाजातील सर्वच लोकांशी आपले घनिष्ठ आणि सलोख्याचे संबंध राहिले आहेत. या निवडणुकीत उतरण्याचे आपली तशी तयारी नव्हती. मात्र राजकीय विरहित लोकांनी मोठा आग्रह केला. नागरिकांनीच बदलाचा ठाम निर्णय केल्याने निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो. शहरातील समस्यांची आपल्याला मोठी जाण आहे. त्यामुळे शहरातील भकासपणा दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे. शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, कलाकारांना प्रशिक्षण केंद्र, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावे स्मारक, शहरातील उपलब्ध बाबींचा वापर करून पर्यटन विकास, शहर विकास आराखड्यातील जागांचा योग्य प्रकारे विकास साधण्यावर भर राहील. मतदारांना कितीही आर्थिक आमिषे दाखवली तरी सावकारीला नागरिक स्थान देणार नाहीत, असा विश्वासही कदम यांनी व्यक्त केला.
---
चौकट
निधीचा गैरवापर
गेल्या सात-आठ वर्षातील पालिकेचा कारभार शहरवासीयांना पाहिला आहे. कोट्यवधींच्या ठेवी देखील मोडल्या गेल्या. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधीचा गैरवापर झाला. मला विरोध करून ज्यांच्या हातात सत्ता दिली, त्यांनी काय दिवे लावले, हे शहरातील जनता चांगलीच ओळखून आहे, असा टोलाही रमेश कदम यांनी लगावला.
---
(पोटात घ्यावी )

चिपळूण स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न ः प्रशांत यादव
चिपळूण ः भविष्याचा वेध घेऊन शहर विकासाचे नियोजन व्हायला हवे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला एकहाती सत्ता मिळाल्यास शहर विकासाला खीळ बसणार नाही. चिपळूण शहर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असे आश्वासन भाजप नेते प्रशांत यादव यांनी शहरातील रॉयलनगर येथील प्रचार सभेत दिले.
चिपळूण पालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपने युती केली असून नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे उमेदवार उमेश सकपाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यासाठी प्रभाग १० मधील रॉयलनगर येथे सभा झाली. या वेळी नगरसेवकपदाचे उमेदवार कपिल शिर्के, रसिका देवळेकर व नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश सकपाळ यांनी भूमिका मांडली. या तिघांनी शहर विकासासाठी युतीने दिलेल्या योगदानाची माहिती देत विकासाचा संकल्प मांडला. यानंतर भाजप नेते प्रशांत यादव म्हणाले, गेल्या काही वर्षात शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. विविध समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. पालिकेत नागरिकांचे प्रश्न आणि समस्या हिमतीने मांडणारे नगरसेवक असायला हवेत. त्यादृष्टीने उच्चशिक्षित उमेदवार दिले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजप युतीचे सरकार आहे. चिपळूण पालिकेची सत्ता युतीच्या ताब्यात दिल्यास शहर विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. शहराची ग्रॅव्हिटी पाणी योजना, रस्त्यांचे रुंदीकरण, शहरातील सांडपाणी व्यवस्थापन, विकास आराखड्यातील जांगांचा विकास, तरुणांना रोजगाराची साधने, पथदीप, भुयारी गटारे, सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते, बागबगिचा आणि क्रीडांगणे विकसित करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com