खेडमध्ये चार जोडपी निवडणूक रिंगणात

खेडमध्ये चार जोडपी निवडणूक रिंगणात

Published on

खेडमध्ये चार दापंत्य निवडणूक रिंगणात
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २९ : खेड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत चार दांपत्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी सपना ऋषिकेश कानडे रिंगणात आहेत. त्यांचे पती ऋषिकेश मनोहर कानडे हे प्रभाग ८ अ मधून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवत आहेत. ऋषिकेश कानडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आहेत. ते सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग १ ब मधून ओंकार विलास कुलकर्णी हे (उबाठा) गटातून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांची पत्नी प्रभाग क्रमांक ६ अ मधून रूपाली ओंकार कुलकर्णी या (उबाठा) मधून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक ८ ब मधून माजी नगरसेविका सुरभी सुनील धामणस्कर या (उबाठा) निवडणूक रिंगणात असून त्यांचे पती सुनील मनोहर धामणस्कर हे प्रभाग क्रमांक ९ ब (उबाठा) मधून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक १० ब मधून कॉंग्रेसचे माजी नगरसेवक बशीर मुजावर निवडणूक लढवत आहेत. त्यांची पत्नी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका कौसर बशीर मुजावर या प्रभाग क्रमांक ७ ब मधून निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ६ ब राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमधून अनिल रामचंद्र सदरे यांनी निवडणुकीचा अर्ज मागे घेतला असून त्यांची पत्नी अपेक्षा अनिल सदरे या ६ अ मधून (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) म्हणून निवडणूक लढवत आहेत. या पतिपत्नीमध्ये कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरला ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com