सभांऐवजी थेट संपर्कावर भर
सभांऐवजी थेट
संपर्कावर भर
राजापूर ः मतदानाला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना राजापूर पालिकेचा निवडणुकीतील प्रचाराच्या अंतिम टप्प्याला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी, महायुती यांच्या उमेदवारांसह अपक्षांनी मोठ्या प्रचारसभा, कॉर्नरसभा घेण्याऐवजी थेट वाडीवस्तीवर जाऊन मतदारांशी संपर्क करीत प्रचार करण्यावर भर दिल्याचे चित्र आहे. उमेदवार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. अंतिम टप्प्यामध्ये प्रचार शिगेला पोहचलेला असून पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. यापूर्वी निवडणूक प्रचारामध्ये निवडणुकीचे वातावरण तयार करण्यासाठी राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याकडून विभागनिहाय मेळावे आणि जाहीर प्रचार सभा घेण्यावर भर दिला जात असे. मात्र, कालपरत्वे या प्रचार तंत्रामध्ये बदल झाल्याचे दिसत असून प्रचाराच्या रणनीतीचा भाग म्हणून विभागीय मेळावे आणि प्रचारसभांना काट दिल्याचे दिसत आहे.
--
मतदानासाठी मंगळवारी
सार्वजनिक सुटी जाहीर
रत्नागिरी : रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या नगरपालिका क्षेत्रात आणि देवरुख, लांजा, गुहागर या नगरपंचायत क्षेत्रात निवडणुकीसाठी मंगळवार २ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना आणि केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम बँका इत्यादींनाही मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी लागू राहील.
----
मतांच्या जुळणीसाठी
उमेदवारांची धावपळ
राजापूर ः राजापूर नगरपालिका निवडणुकीचे मतदान अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे प्रचाराला वेग आला असून राजकीय पक्षांसह उमेदवार निवडणूक प्रचारामध्ये गुंतले आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी ‘काँटे की टक्कर’ लढत होत असलेल्या निवडणुकीमध्ये एका-एका मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मतदारांची जुळवाजुळव करत असताना मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंद आहे, मात्र सध्या ते शहराबाहेर वास्तव्यास आहेत अशा मतदारांची माहिती गोळा करून त्यांच्याशी संपर्क साधण्यावर उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणुकीसाठी ८ हजार १४३ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. प्रचाराच्या माध्यमातून या मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर सध्या उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भर दिला आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

