केळीच्या सोफांपासून किल्ल्याची प्रतिकृती
07457
केळीच्या सोफांपासून किल्ल्याची प्रतिकृती
आचऱ्यातील कला; सलग १४ तास ग्रुपची मेहनत
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २९ ः येथील आदर्श व्यापारी संघटनेच्या वार्षिक सत्यनारायण पूजेसाठी स्वामी रामेश्वर मखर सजावट ग्रुपतर्फे केळीच्या सोफांपासून किल्ला प्रतिकृती उभारली आहे. ग्रुपच्या मंडळींनी सलग १४ तास झटून उभारलेली ही प्रतिकृती भाविकांचे आकर्षण ठरली आहे.
या अगोदर ग्रुपने साकारलेल्या राम मंदिर प्रतिकृतीची दखल राज्यभरातील प्रसारमाध्यमांनी घेतली होती. आदर्श व्यापारी संघटना दरवर्षी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करते. यासाठी स्वामी रामेश्वर मखर सजावट ग्रुप सहकार्याच्या भावनेने पूजेचे मखर बनवितात. यावर्षी या ग्रुपचे हेमंत गोवेकर, रुपेश बागवे, प्रशांत सावंत, चंदू कदम, रुपेश पुजारे, नीलेश पुजारे, मुकेश पुजारे, परेश पुजारे, समीर गावकर, शैलेश शेट्ये, पराग गोवेकर, प्रसाद गुरव, सदा पुजारे, राम मिराशी आदींनी सलग चौदा तासांच्या अथक प्रयत्नांतून सत्यनारायण महापूजेसाठी किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती उभारली. जिल्हा महासंघाचे खजिनदार अरविंद नेवाळकर आणि सहकाऱ्यांनी भेट देत आदर्श व्यापारी संघटनेच्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, सल्लागार व आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपाध्यक्ष मंदार सांबारी, सचिव पंकज आचरेकर, खजिनदार जयप्रकाश परुळेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

