निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत पोलीस संचलन

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत पोलीस संचलन

Published on

rat२९p१०.jpg-
२५O०७४६०
रत्नागिरी- पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी शहरात संचलन केले.
-----
रत्नागिरी शहरातून पोलिसांचे संचलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शहर पोलिसांनी शहरात संचलन केले. यामध्ये दंगल नियंत्रण पथकाचे २८ अंमलदार, शहर पोलिस ठाण्याचे १० अंमलदार, ६८ होमगार्ड आदींचा यामध्ये समावेश होता.
रत्नागिरी पालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. २ तारखेला त्यासाठी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया निर्भयपणे आणि पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी पोलिस दलाने चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मतदार कोणत्याही दडपणाखाली राहू नये, कायदा आपल्याबरोबर आहे, हा विश्वास देण्यासाठी पोलिसांनी आज सकाळी शहरात संचलन केले. आज सायंकाळी शहरामध्ये साडेचार ते साडेपाच या दरम्यान रहाटघर बस स्थानक, भुते नाका, बंदर रोड, मिरकरवाडा व मिरकरवाडा जेटीपर्यंत रूट मार्च घेण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईंनकर, शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, २ अधिकारी, दंगल नियंत्रण पथकाचे २८ अंमलदार, शहर पोलिस ठाण्याचे १० अंमलदार, ६८ होमगार्ड या संचलनामध्ये सामील झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com