मतदान कालावधीत सतर्कता बाळगा
07474
मतदान कालावधीत सतर्कता बाळगा
जिल्हाधिकारी ः प्रशसनातर्फे निवडणूक व्यवस्थेबाबत आढावा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २९ ः नगरपरिषद तसेच नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण आणि कणकवली येथे भेट देत निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार काटेकोर कामकाज करण्याचे निर्देश दिले. पोलिस अधीक्षक डॉ. दहिकर यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देत सूचना केल्या.
दौऱ्याची सुरुवात सावंतवाडी येथून झाली. येथे निवडणुकीच्या विविध टप्प्यांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी प्रशिक्षण सत्र तसेच स्टाँग रूमला भेट दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जिरगे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण उपस्थित होते. त्यानंतर वेंगुर्ले नगरपरिषदेत निवडणूक प्रशिक्षणाला भेट देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीचे सविस्तर विवरण सादर केले. वेंगुर्ले नगरपरिषद क्षेत्रात एकूण १०,११५ मतदार असून त्यात पुरुष मतदार ४,८७१ तर महिला मतदार ५,२४४ एवढे असल्याचे सांगितले. राज्य निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या विविध कक्षांची स्थापना पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
---
मालवणातही यंत्रणेचा आढावा
मालवण पालिका कार्यालयात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी भेट देत निवडणूक तयारीचा तपशीलवार आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी मतदान प्रक्रियेपासून कायदा-सुव्यवस्था उपाययोजनांपर्यंत सर्व माहिती सादर केली. या भेटीत पोलिस निरीक्षक मारुती जगताप उपस्थित होते.
---
कणकवलीतही स्ट्राँग रूमची तपासणी
कणकवली तहसील कार्यालयातही जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी भेट देत निवडणूक व्यवस्था व स्ट्राँग रूमची तपासणी केली. यावेळी प्रांत अधिकारी जगदीश काटकर, निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी पाटील उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

