संविधानाला अभिप्रेत राष्ट्र घडवूया
07581
संविधानाला अभिप्रेत राष्ट्र घडवूया
उमेश गाळवणकर ः कुडाळ नाथ पै संस्थेत संविधान दिन
कुडाळ, ता. ३० ः जगातील सर्वांत मोठे लिखित संविधान म्हणजे भारतीय राज्यघटना होय. या संविधानाने दिलेली जबाबदारी, कर्तव्य आनंदाने पार पाडूया आणि देश बलसागर बनवूया. असे जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा केल्याचा आनंद मिळेल, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. गाळवणकर म्हणाले, ‘संविधानाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. देशाच्या अखंडततेसाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया. देशाचा विकास आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी संविधानाचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. ज्यांच्या त्यागामुळे आज स्वतंत्र भारतामध्ये सन्मानाने जगत आहोत, त्या सर्व हुतात्म्यांचे मनात स्मरण ठेवून त्यांच्या प्रतिआदर व्यक्त करा. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे पाईक होऊन संविधानास अभिप्रेत असणाऱ्या राष्ट्र उभारणीचे आपण घटक होऊ शकतो.’
संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रत्युषरंजन बिस्वाल, महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बी.एड्. महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर आदी उपस्थित होते. प्रस्तावनेमध्ये प्रा. मर्गज यांनी संविधानाच्या निर्मितीमागचा हेतू व एकंदर संविधानाची रचना थोडक्यात कथन करून आपल्या भारताच्या संविधानाचे वेगळेपण स्पष्ट केले. अश्विनी परब यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. एनसीसी डे निमित्त यावेळी एनसीसी गीताचे व राष्ट्रगीताचे सर्वांनी सामूहिक गायन केले. मंदार जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

