राजापूर-राजापूरच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट

राजापूर-राजापूरच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट

Published on

rat30p20.jpg
07612
राजापूरः महायुतीच्या उमेदवारांच्या जवाहरचौकातील प्रचार सभेत पालकमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले.
--------------

राजापूरच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट
पालकमंत्री सामंतः जवाहर चौकात जाहीर सभा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३०ः राजापूर शहराच्या विकासासाठी नगरपालिकेला निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शहराला भेडसावणारा पूररेषेचा प्रश्‍न, पाणीपुरवठा, आरोग्य सेवेचा प्रश्‍न असो वा रोजगार यासह अन्य सर्व प्रश्‍न सोडवून राजापूरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महायुतीचा नगराध्यक्ष गरजेचा आहे. त्यामुळे राजापूरवासीयांनी राजापूर पालिकेची सत्ता महायुतीच्या हातात द्यावी, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारासाठी जवाहर चौक येथे जाहीर सभा झाली. या वेळी आमदार किरण सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख यशवंत जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, जिल्हा संघटक विलास चाळके, राजन देसाई, अविनाश लाड, भाजप महिला प्रदेश सचिव शिल्पा मराठे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रृती ताम्हणकर, दीपक नागले, अशफाक हाजू, मजिद पन्हळेकर, शशिकांत सुतार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, किरण सामंत आमदार झाल्यानंतर मागील वर्षभरात शहराचा झपाट्याने विकास होत आहे. मागील पंधरा वर्षात हा विकास का झाला नाही याचा विचार जनतेने करावा. राजापूरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पालिकेमध्ये महायुतीची सत्ता येणे गरजेचे असून सर्वांची जबाबदारी आहे.

चौकट
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा मोबाईलद्वारे संवाद
या प्रचार सभेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाईलद्वारे राजापूरवासीयांशी संवाद साधला. राजापूरच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसून चोवीस तास पाणी पुरवठा, पूररेषा व पुराचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com