चिपळूण-जिल्ह्यात रविवारी प्रचाराचा धुरळा

चिपळूण-जिल्ह्यात रविवारी प्रचाराचा धुरळा

Published on

जिल्ह्यात रविवारी
दिवसभर प्रचाराचा धुरळा
पालिका निवडणूका; प्रचार अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० : दिवसेंदिवस चुरशीच्या बनत चाललेल्या जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या सुरू असलेल्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सोमवारी (ता. १ डिसेंबर) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.
जिल्ह्यातील दोन नगरपंचायती व चार पालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. स्थानिक नेत्यांवरच प्रचाराची धुरा असल्याने त्यांनाही जिल्ह्याबाहेर जात येत नसल्याचे दिसत आहे. जाहीर प्रचार सभांपेक्षा घरोघरी, दारोदारी मतदारांना भेटण्यावरच उमेदवारांचा जास्त भर आहे. निवडणूक आयोगाने प्रचाराचा कालावधी एक दिवसाने वाढवला आहे, त्यामुळे अखेरच्या दिवशी एक डिसेंबरला वाहनांच्या रॅली काढून राजकीय पक्ष शक्तीप्रदर्शन करतील अशी अपेक्षा आहे.
रविवारी सकाळसूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवर उमेदवार व त्यांच्या समर्थकांची लगबग सुरू होती. ठिकठिकाणी लावण्यात आलेले पक्षांचे झेंडे, चौकात उभारण्यात आलेले बॅनर यांनी रस्ते सजले होते. महिला संघटना, युवक मंडळे साथ मिळवण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी दिलेल्या घोषणा, ढोल-ताशांसह काढलेल्या शोभायात्रांमुळे उत्साहाचे वातारण निर्माण झाले होते.
प्रचाराचे काही तास उरल्याने आपली बाजू पटवून देण्यासाठी उमेदवारांनी कोपरा सभेवर भर दिला आहे. प्रचारात महिलांचा आणि युवकांचा उत्साह जाणवत होता. युवकांनी सोशल मीडियावरूनही प्रचाराचा धुरळा उठविण्यात आला. महिलांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. यामुळे लहान लहान वस्त्यांमध्येही निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. काही उमेदवारांनी बाजारपेठा, आठवडा बाजारात जाऊन थेट मतदारांशी संपर्क साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com