दोडामार्ग ते माणगाव पालखी
पदयात्रेस भाविकांचा प्रतिसाद

दोडामार्ग ते माणगाव पालखी पदयात्रेस भाविकांचा प्रतिसाद

Published on

07618

दोडामार्ग ते माणगाव पालखी
पदयात्रेस भाविकांचा प्रतिसाद
बांदा ः दोडामार्ग ते माणगाव श्री टेंबे स्वामींच्या पालखी पदयात्रेला शुक्रवारी (ता. २८) प्रारंभ झाला असून मार्गात जागोजागी त्यांचे स्वागत केले जात आहे. यंदाचे या पालखी सोहळ्याचे आठवे वर्ष आहे. प्रतिवर्षी या पदयात्रेतील भाविकांचा सहभाग वाढत आहे. शनिवारी (ता. २९) पहाटे गणपती मंदिर येथून पायी पालखी प्रस्थान झाले. मार्गात सासोली, कळणे, आडाळी, डेगवे येथील भाविकांनी पालखीचे स्वागत, पूजन, अल्पोपहार, महाप्रसाद आदी सेवा केली. सायंकाळी ५.३० वाजता संत सोहिरोबानाथ आंबिये मठ, बांदा येथे पालखीचे आगमन झाले. यावेळी पूजन व आरती झाली. चहापानानंतर पालखीचे प्रस्थान झाले. पुढे दत्तमंदिर इन्सुली कस्टम ऑफिस येथे आरती व पूजन, संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर इन्सुली डोबाशेळ येथे पालखी पूजन, आरती, महाप्रसाद, रात्री भजन सेवा व पालखी मुक्काम, आज पहाटे ५ वाजता आरती, पालखी पूजन व माणगावकडे पालखीचे प्रस्थान झाले.
....................
07617

प्रकाश वायंगणकरांना पदोन्नती
तळेरे, ता. ३० : येथील योगेश वायंगणकर यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली. याबद्दल त्यांचे तळेरेवासीय आणि मित्रमंडळींकडून अभिनंदन करण्यात येत आहे. वायंगणकर यांनी गेली १६ वर्षे मुंबई आणि गडचिरोली येथे विविध पदांवर सेवा केली आहे. उत्तम शरीरसौष्ठवपटू म्हणूनही त्यांनी सिंधुदुर्गासह मुंबईत नावलौकिक मिळविला आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com