संविता आश्रमास अन्न, वस्त्रदान

संविता आश्रमास अन्न, वस्त्रदान

Published on

07631

संविता आश्रमास अन्न, वस्‍त्रदान
बांदा : पडवे-माजगाव जिल्हा परिषद शाळेच्या पदवीधर शिक्षिका सुजाता गवस यांनी निवृत्तीचे औचित्य साधून संविता आश्रम, पणदूर येथे एक दिवसीय ‘अन्नदान व वस्‍त्रदान’ उपक्रम राबविला. सौ. गवस नियत वयोमानानुसार ३० नोव्हेंबरला निवृत्त झाल्या. दीर्घ सेवा काळात त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि मानवी मूल्यांचे संवर्धन करत शिक्षकी सेवेची एक उल्लेखनीय परंपरा निर्माण केली. गरजूंसाठी मदतीचा हा हात म्हणजे त्यांच्या सेवाभावाचे द्योतक असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
................
07632

आचऱ्यातील खेळाडूंचे यश
मुणगे ता. ३० : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेमध्ये आचरा (ता. मालवण) येथील चेतना चव्हाण यांनी सुवर्ण, आशीष पेडणेकर यांनी रौप्य, आशा हजारे यांनी कांस्यपदक मिळविले. त्यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन आणि नागरिक साहाय्य केंद्र विश्वस्त मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० नोव्हेंबर कालावधीत मुंबई वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालय येथे राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये आचरा येथील मसल क्रिएशन फिटनेस ग्रुपने सहभाग घेतला होता. यात सहभागी खेळाडूंनी उज्‍ज्वल यश प्राप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com