वडापाव लय भारी......!
फिरस्ती - लोगो
वडापाव लय भारी......!
सध्या सर्वत्र धामधुम सुरू आहे ती....प्रचाराची. कार्यकर्तेही आपापल्या उमेदवारांच्या मदतीसाठी धावताना दिसत आहेत. दिवसभर मतदारांच्या गाठीभेटी घेऊन दमलेले कार्यकर्ते संध्याकाळी चहा-नाश्ता करण्याच्या अपेक्षेने कार्यालयात येतात. पुन्हा रात्री गाठीभेठीचे नियोजन असतेच. असच एका पक्षाचे कार्यकर्ते संध्याकाळी कार्यालयात येऊन बसलेले होते. त्यांनी तेथीले प्रमुखाला सांगितले, साहेब तेवढं नाश्त्याचं बघा की? त्यांचा प्रमुखही लगेचच जवळच्या बाबूला फोन करतो. अरे बाबू सर्वांना चहा-नाश्ता घेऊन ये रे...! बाबूही पडत्या फळाची आज्ञा मानून मोठ्याने हो...कार भरतो. पण त्याचं सर्वकाही असते ते खर्चाच गणित बसवायचं. खर्च अवाच्या सव्वा झालेला, त्यात अखरेचे दिवस. त्यामुळे बाबूही थोडी विचार करतच असतो. तो ही लगेचच दादाला फोन लावला....दादा वीस वडावाप आणि चहा कार्यालयात पाठवून द्या. अर्ध्या तासातच चविष्ट आणि गरमागरम वडापाव कार्यालयात घेऊन दादा हजर. दादांनी आणलेल्या गरमागरम वडापाववर सर्वच ताव मारतात आणि खुशही होता. तेवढ्यात एकजणं म्हणतो....कुणीहा काही म्हणो.....आपला वडापाव लय भारीच...! त्याचं वाक्य ऐकून इकडे बाबूशेठपण खुश होऊन पुढच्या कामाला जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

