नेटिव्ह जनरल लायब्ररीची नगरपालिकेकडून पाठराखण
rat30p22.jpg-
07639
जिल्हा नगर वाचनालय
---------
फ्लॅशबॅक - लोगो
इंट्रो
नेटिव्ह जनरल लायब्ररी म्हणून १८२८ साली सुरू झालेले वाचनालय दोन वर्षात दोनशे वर्षांचे होईल. या वाचनालयासाठी १९५२ साली अस्तित्वात असलेल्या रत्नागिरी नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिली होती. तो करार पुढे कायम होत राहिला आणि रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाची आठवण कायम जपली गेली.
----
नेटिव्ह जनरल लायब्ररीची
नगरपालिकेकडून पाठराखण
नेटिव्ह जनरल लायब्ररी ही व्यवस्था १९२८ साली उभी केली गेली, ती रत्नागिरीतील तत्कालीन उच्च अधिकारी, उच्च पदस्थ व्यक्तिमत्व यांना एकत्र जमण्यासाठी. तेव्हा एकत्र येण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. ही गरज ओळखून जे. एच. थ्रोट यांनी हे वाचनालय स्थापन केले. त्यावेळी वाचनालयाची वर्गणी २५ रूपये होती, असा एक संदर्भ मिळतो. त्यावेळी एकूण ४४ सभासद होते. त्यातील ११ इंग्रज तर ३४ स्थानिक होते. त्यापैकी २ जण २ रुपये वर्गणी देत आणि ११ जण १ रुपया देत होते. ५ जणांकडून ५० पैसे आणि सहा जण ४ आणे वर्गणी देत होते. त्यावेळी साधारण ४५० पुस्तके वाचनालयात होती. या लायब्ररी इमारतीवर ब्रिटिश राणीचा मोठा फोटो होता. तो फोटो वादळ पावसात पडला. मात्र तत्कालीन शासकीय यंत्रणेने हा फोटो जाणीवपूर्वक पडला गेल्याचा ग्रह केला आणि सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना वाचनालयाचे सभासदत्व रद्द करण्याचा आदेश दिले. त्यानुसार आदेशाचे पालन झाले आणि वाचनालयाचे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले. स्वाभाविक वाचनालय बंद पडले.
पुढे रत्नागिरी येथे न्यायाधीश म्हणून मा. खारेघाट सर नियुक्त झाले. त्यांचा कालखंड खूप प्रेरणादायी होता. अत्यंत लोकप्रिय असे न्यायाधीश म्हणून त्यांची प्रतिमा होती. त्यांना हे वाचनालय बंद स्थितीत असल्याचे कळले आणि कोणत्या कारणांनी ते बंद आहे हे ही कळले. त्यावेळी त्यांनी योग्य त्या अधिकाऱ्याकडे पिटीशन फाईल केले. तो पिटीशन आजही वाचनालयाच्या दप्तरी आहे. त्या पिटीशनमधून फोटो पडल्याची नेमकी वस्तूस्थिती मांडील. तसेच वाचनालय पुन्हा सुरू करण्याची विनंतीही केली. त्या पिटीशनवर सकारात्मक निर्णय झाला आणि वाचनालय सुरू झाले. बराच काळ वाचनालय बंद असल्याने मोठे नुकसान झाले होते. मात्र परत वाचनालय न्यायाधीश खारेघाट यांच्या प्रयत्नातून सुरू झाले. हे वाचनालय कार्यरत ठेवण्यासाठी अनेकांनी प्रयत्ने केले होते. रत्नागिरीतील अनेक वास्तूंपैकी रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालय हे एक आहे. या वाचनालयासाठी रत्नागिरी नगरपालिकेने १९५२ साली जागा दिली होती. हा करार ३० वर्षांचा होता. १९५२ ते १९७२ असा कराराचा कालावधी होता. त्यानंतर १९७२ ते १९९२ पर्यंत करार केला गेला. परंतु १९९२ नंतर त्यात खंड पडला. बराच काळ नवीन करार झाला नाही. सुदैवाने वाचनालय जैसे थे राहिले आणि रत्नागिरीतील वाचकप्रेमींना वाचनाचे द्वार खुले राहिले. अॅड. दीपक पटवर्धन यांच्या प्रयत्नांनी २०२४ मध्ये करार नव्याने करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

