परिश्रमांसोबत शिस्तही महत्त्वाची

परिश्रमांसोबत शिस्तही महत्त्वाची

Published on

07633

परिश्रमांसोबत शिस्तही महत्त्वाची

सुमुख चव्हाण ः बांदा दिव्य ज्योती प्रशालेत क्रीडा महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३० ः विद्यार्थीदशेत सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. त्यामुळे आपले कौशल्य कोणत्या खेळात आहे, हे समजेल. आपल्या गटासाठी खेळताना स्वतःचे शंभर टक्के योगदान द्या. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठीण परिश्रमांसोबतच शिस्तही महत्त्वाची आहे. परिश्रमाला शिस्तीची जोड मिळाली तर यश तुमच्याच पदरी आहे, असे प्रतिपादन बॅडमिंटन प्रशिक्षक सुमुख चव्हाण यांनी येथे केले. दिव्य ज्योती प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
दिव्य ज्योती प्रशालेचा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक क्रीडा महोत्सव २८ व २९ नोव्हेंबरला मोठ्या उत्साहात झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सावंतवाडी येथील एन.आय.एस. प्रमाणित बॅडमिंटनचे प्रशिक्षक सुमुख चव्हाण, मुख्याध्यापक फादर रॉबिन, मॅनेजर फादर लिजो उपस्थित होते. प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी गटानुसार उत्कृष्टरित्या संचलन सादर केले. क्रीडा मशाल पेटवून स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी अनेक सांघिक आणि वैयक्तिक खेळांत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि कौशल्य दाखविले. या दोन दिवशीय क्रीडा महोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, सांघिकता, शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास वाढविल्याचे पालकांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा सहभाग यामुळे दिव्य ज्योती प्रशालेचा वार्षिक क्रीडा महोत्सव यशस्वी ठरला. प्रशालेची विद्यार्थिनी स्वरा सातार्डेकर हिने सूत्रसंचालन केले. विद्यार्थी प्रतिनिधी राजीव कोलते याने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com