संगमेश्वर-देवरूख–संगमेश्वर मार्ग वाहतुकीस धोकादायक
rat30p4.jpg-
07554
संगमेश्वर ः देवरूख-संगमेश्वर मार्गावर पडलेले खड्डे.
rat30p5.jpg
07555
संगमेश्वर ः खड्ड्यातून मार्ग काढणारी दुचाकी आणि रिक्षा.
----------
देवरूख–संगमेश्वर मार्ग वाहतुकीस धोकादायक
दुरुस्ती न झाल्यास निवडणूकीवर बहिष्कार ; स्त्यावर धुळीचे लोट
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३०ः देवरूख – संगमेश्वर राज्य मार्गावरील लोवले परिसरात रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर टाकण्यात आलेले लोखंडी आणि सिमेंटचे खांब धोक्याचे कारण ठरत आहेत. आधीच रस्त्याची दुरवस्था व अरुंद वळणांमुळे अपघातांची मालिका सुरू असताना साईड पट्ट्यांवर ठेवण्यात आलेले हे खांबामुळे प्रवास अधिकच धोकादायक झाला आहे.
पावसाळा संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग संगमेश्वर-देवरूख मार्गावरील खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने या मार्गावर सातत्याने अपघात घडत असून धुळीचे लोटही उठत आहेत. या रस्त्याची तातडीने डागडुजी न झाल्यास आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची तयारी या मार्गावरील गावांनी केली आहे.
संगमेश्वर–देवरुख मार्गाचे रुंदीकरण सुरू असताना अनेक ठिकाणी धोकादायक वळणे निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत रस्त्याच्या अगदी कडेला सिमेंट व लोखंडी खांब ठेवण्यात आल्याने प्रवासी आणि वाहनचालक यांच्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्याच्या बाजूला वाढलेले गवत आधीच मोठी अडचण ठरत असताना त्यातच साईड पट्ट्यांवर खांब बसवल्याने पादचारी मार्ग अडला आहे.
ग्रामस्थ आणि प्रवाशांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, सिमेंट खांब त्वरित हटवावेत, अन्यथा आम्ही स्वतः ते काढण्याची कारवाई करू. फक्त लोवलेच नव्हे, तर देवरूख–साखरपा मार्गावरही धोकादायक पद्धतीने खांब बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली असून हे काम तत्काळ थांबवावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
चौकट
सहा किमीला लागतात ४० मिनिटे
संगमेश्वर-देवरूख मार्गावर संगमेश्वर ते बुरंबी दरम्यान असंख्य खड्डे पडले असून सहा किलोमीटरचे हे अंतर पार करण्यास तब्बल ४० मिनिटे लागत आहेत. या खड्ड्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत असून वाहनांचीही दुर्दशा होत आहे. वयोवृद्ध मंडळींना या मार्गावरून जाताना त्रास होत असून वाहन चालकांना वाहन चालवताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोट
यावर्षीचा पाऊस थांबून तब्बल महिना होत आला. संगमेश्वर-देवरुख मार्गावरील धोकादायक खड्डे भरण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. या मार्गावरील लोकांची घरे धुळीने माखली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारासह लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या दुर्लक्षाला सामान्य जनता कंटाळली आहे. त्यामुळे आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची तयारी संगमेश्वर-देवरूख मार्गावरील गावांनी सुरू केली आहे. त्याबाबत गावातून चर्चा सुरू आहे.
- रवींद्र हळबे, माजी ग्रामपंचायत सदस्य, शिवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

