खेडमध्ये आश्वासन पत्रामध्ये अनेक मुद्द्यांवर साम्य

खेडमध्ये आश्वासन पत्रामध्ये अनेक मुद्द्यांवर साम्य

Published on

खेडमध्ये आश्वासन पत्रामध्ये अनेक मुद्द्यांवर साम्य
आघाडी- युतीमध्ये एकमत ; विकासाची दिशा जवळपास सारखीच
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता‌. ३० : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी आणि युती या दोन्ही पॅनेलकडून जाहीर केलेल्या आश्वासन पत्रामध्ये अनेक मुद्द्यांवर आश्चर्यकारक साम्य दिसून येत आहे. शहराच्या एकूण विकासाची दिशा दोन्ही गटांनी जवळपास सारखीच असून मतदारांना विकासाचा विस्तृत रोड मॅप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नागरिकांन समोर मोठा पेच उभा राहिला आहे.
दोन्ही पॅनलने अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण काँक्रिटीकरण विशेषत: पूर परिस्थितीत पाणी साचणाऱ्या रस्त्याची सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील बोजवारा निघालेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेत अमूलाग्र बदल, मुबलक व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे हे दोघांच्याही जाहीरनाम्यात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. शहरातील उद्याने, चौक व मनोरंजन क्षेत्राचे सुशोभीकरण हे आणखीन एक सामायिक वचन दोन्ही जाहीरनाम्यामध्ये ठळकपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुलांसाठी खेळणी, हरितक्षेत्रे वाढवणे, बंद अवस्थेतील उद्यानांचे नूतनीकरण अशा सुविधा उभारण्याची घोषणा दोन्हीकडून करण्यात आली आहे. यासोबतच नागरिकांच्या आरोग्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणारी ओपन जिमची उभारणे हा मुद्दा देखील आघाडी व युती चा समान मुद्दा चर्चेत आहेच. शहरातील स्वच्छता व्यवस्था, सुधारणा, घन कचरा व्यवस्थापनासाठी यंत्रणा, नाले - गटारे सुधारणाच्या मूलभूत नागरी सुविधांची उभारणी हे मुद्दे देखील दोन्हीकडून समानपणे मांडले गेले आहेत. पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाची हमी दोन्ही गटांनी देत नागरिकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नगरपरिषद दवाखाना अत्याधुनिक करणे, प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करणे, नगरपरिषद इमारती व व्यापारी संकुल यांच्या सुविधा सुधारणा यासारखे मुद्देही दोन्ही गटाच्या घोषणेत दिसून येतात. शहराचा सांस्कृतिक ऐतिहासिक ओळख अधोरेखित करणारे यासारखे उपक्रम देखील दोन्हीकडून मांडण्यात आले आहेत.

चौकट
कुणाच्या बाजूने कौल
शहर विकासासाठीचे दोन्ही पक्षाचे जाहीरनाम्यातील समानता पाहता मतदारांसमोर विकासाची चित्रे जवळपास सारखेच उभी करण्यात आले आहे.त्यामुळे मतदार खऱ्या अर्थाने कुणाच्या बाजूने कौल देतात हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com