ॲग्रोवन कृषी प्रदर्शन

ॲग्रोवन कृषी प्रदर्शन

Published on

इतर आवृत्तीसाठी

०७६२३
सांगली ः ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात रविवारी सलग तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.

प्रदर्शनाला भेट द्या, आज शेवटची संधी
‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ः आज समारोप
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. ३० : शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, प्रगत बियाणे, खत-औषधे आणि कृषिपूरक उद्योगातील नवीन संधी यांची माहिती एकाच छताखाली देणाऱ्या ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या भव्य प्रदर्शनाचा उद्या (ता. १) समारोप होत असून, प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज शेवटची संधी आहे.
विश्रामबाग येथील विलिंग्डन महाविद्यालयाच्या मैदानावर हे प्रदर्शन भरले आहे. कन्हैय्या अॅग्रो’प्रस्तुत ‘अॅग्रोवन अॅग्री एक्स्पो-२०२५’ पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स, विटा, बी. जी. चितळे डेअरी, भिलवडी व निसर्ग क्रॉप केअर इंडिया प्रा. लि. तासगाव, तर सहप्रायोजक वर्षा अॅग्रो इंड्रस्टीज, तासगाव, आयडियल अॅग्री सर्च, सांगली, माधुरी सोलर, वारणा दूध संघ, वारणानगर, कारगिल अॅनिमल न्युट्रिशन अँड हेल्थ, बॅंकिंग पार्टनर स्टेट बॅंक ऑफ इंडिया आहेत.
प्रदर्शनस्थळी सकाळपासूनच शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. रविवारची सुटी असल्याने आज शहरी ग्राहकांनीही मोठा प्रतिसाद प्रदर्शनाला दिला. शेतकरी, कृषी विद्यार्थी, संशोधक, तरुण उद्योजक यांनी प्रदर्शनास भेट दिली. अनेकजण सहकुटुंब प्रदर्शनात आले होते. त्यात त्यांचा विशेषकरून कृषिपूरक, प्रक्रिया तसेच घरगुती स्वरुपात लघुउद्योगाची माहिती घेण्याकडे कल होता. अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून आपल्या शेतीत काही प्रयोग करता येतील, अशा अनेक नवकल्पना जाणून घेतल्या. उद्या (सोमवारी) सायंकाळपर्यंत प्रदर्शनात प्रवेश खुला असणार आहे.


एकाच छताखाली अत्याधुनिक शेतीची माहिती
कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांनी एआय-आधारित तंत्रज्ञान, जलसंधारणातील नवी तंत्रे, सेंद्रिय शेतीविषयीची माहिती, बागायती पिकांची आधुनिक लागवड पद्धती, तसेच ब्लोअर, ट्रॅक्टर्स, पाण्याची बचत करणाऱ्या सेन्सर-आधारित प्रणाली, सुधारित बियाणे, शाश्वत शेतीसाठी उपाय, पशुखाद्य आणि दुग्ध उत्पादनांची माहिती घेतली. तसेच तरुणांसाठी कृषी उद्योजकतेच्या दृष्टीने अनेक नवतंत्रज्ञानाची मेजवानी प्रदर्शनाने दिली. शेतकऱ्यांनी या सगळ्याचा एकाच छताखाली समृद्ध अनुभव घेतला.


कृषी कंपन्यांकडून खास सवलती
शेतीमध्ये उपयोगी पडणाऱ्या मशागतीच्या अगदी छोट्या-छोट्या अवजारांपासून ट्रॅक्टर, ब्लोअरसह अनेक कृषी उत्पादने तयार करणाऱ्या कृषी कंपन्यांनी आपल्या उत्पादनांवर खास कृषी प्रदर्शनासाठी १० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलती जाहीर केल्या आहेत. शेतकऱ्यांना अगदी परवडणाऱ्या दरात ही उत्पादने खरेदी करण्याची मोठी संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com